तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा नगर पालिका प्रशासनाच्या बेजबाबदार पणा बाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज २३ मे ला जिल्हाधिकारी अकोला यांची भेट घेऊन तेल्हारा शहरातील न प प्रशासनाची हलगर्जी पणा बाबत तक्रार करण्यात आली कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा बाबत तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकी दरम्यान माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी अकोला यांनी आज तहसील कार्यालय तेल्हारा येथे कोरोना विषाणू बाबत उपाययोजना बाबत बैठक घेतली त्या नंतर शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहरातील उपाय योजनांची योग्य अंमबलबजावणी होत नसल्याबाबत व तेल्हारा येथील नगर परिषद कार्यालय द्वारे राबवण्यात यायला व्हावा अश्या विविध उपाययोजनेची पायमल्ली होत आहे . आपल्या आदेशानुसार प्रवासी नागरिकांची योग्य नोंद करणे व त्यांना विलगीकरण करणे आवश्यक आहे. तरीही तेल्हारा नगर परिषदेकडून फक्त कागदोपत्री नोंदी सुरु असून मोठ्या प्रमाणावर शहरात प्रवासी नागरिक येत आहे अश्या शेकडो नागरिकांची नोंद नगर परिषदेने केलेली नाही . नोंदी करण्या करीता नियुक्त केलेले पालिकेचे कर्मचारी फक्त कागदोपत्री नोंदी करत आहे त्यांची योग्य ती अंबलबजावणी होत नसल्याची बाब नागरिकांकडून प्राप्त होत आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व जे दुकानदार डिस्टन्सिंग ठेवण्याचे पालन करत नसतील त्या दुकानदारांवर कारवाई करण्यास दिरंगाई व टाळाटाळ मुख्याधिकारी यांच्या कडून होत आहे त्यामुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा होत आहेत .
शासन आदेशांनुसार प्रवासी आलेल्या नागरिकाना विलगीकरण करून राहणे बंधनकारक आहे त्या करीता नगर परिषद कडून प्रवासी नागरिकांसाठी नगर परिषद शाळेमध्ये स्थळ निश्चित करण्यात आले आहे याच शाळेत भाजी मार्केट असून या शाळेत दररोज शेकडो नागिरक भाजी मार्केट मध्ये ये जा करतात तरीही हि जागा प्रवासी नागरिकांसाठी विलगीकरण साठी ठेवणे आरोग्यास हानीकारण आहे . वारंवार नगर पालिकेला निवेदन सादर करून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही असे निवेदन सुध्दा देण्यात आले आहे. या वेळी युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे , माजी शिवसेना शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के, माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर , तालुका समनवयक प्रवीण वैष्णव ,युवासेना शहर प्रमुख राम वाकोडे , सुरेश सिसोदिया आदी उपस्थित होते