अकोला- कांद्याच्या माळ गळा आणि मूठभर कापूस जाळा! शेतकरी संघटना अकोला जिल्हा यांच्या वतीने आज राज्यभर होणाऱ्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. शासनाने शेतकऱयांच्या कापूस व कांद्याची कोंडी फोडावी या मागणी साठी हे आंदोलन छडले होते. २२मार्च च्या लोकडाऊन घोषणे नंतर शेतकऱ्याना अनेक प्रश्नांना सामोरे जाव लागत आहे.
कापसाच्या गज्यां घरात आहेत पुढे पेरणीचे दिवस आले आहेत व्यापारी या संधीचा फायदा घेऊन शेतकऱयांची लुट करत आहेत. किमान आधारभूत किमतीवर शासनाची खरेदी चालू आहे पण ते अतिशय संत गतीने आहे ह्या गतीने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून घेण्यास सहा ते आठ महिने लागणार आहेत. सरकारने खरेदी केंद्र वाढून जलद गतीने कापूस खरेदी करावा तसेच CCI ला लांब, मध्येम व आखूड धाग्याचा कापूस खरेदी करण्याचा आदेश द्यावा. जर सरकार कापूस खरेदी करू शकत नसेल तर भावंतर योजने अंतर्गत शेतकऱयांच्या खात्यात पैसे जमा करावे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा नाफेड मार्फत शासनाने दोन हजार रु किंटल ने खरेदी करावा या मागण्यांसाठी कांदा व कापसाची कोंडी फोडण्यासाठी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनात शासनाच्या नियमांचे पालन करत CCI च्या अकोला येथील ऑफिस समोर कापूस जाळून व कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी संघटनेचे धांनजय मिश्रा विलास ताथोड, डॉ निलेश पाटील व अविनाश नाकट यांनी आज प्रतिकात्म आंदोलन केले आहे.