मुंबई : कोरोनाचा फैलाव आटोक्यात येण्याची लक्षणे दिसत नसल्यामुळे केंद्र सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा असेल. त्याआधी महाराष्ट्र सरकारनेही अधिसूचना काढून लॉकडाऊन आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आल्याचे घोषित केले. अर्थात हा लॉकडाऊनदेखील आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे कडक राहणार असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पाच महत्त्वाच्या सवलती लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात देण्यात आल्या आहेत. त्या अशा- लॉकडाऊन-4 नवीन रूपात देशवासीयांसमोर येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच केली होती.
नव्या लॉकडाऊनमध्ये कोरोनासंबंधीचे झोन ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून संबंधित जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या आधारे रेड, ऑरेंज तसेच ग्रीन झोन ठरवले जात होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मापदंडानुसार हे झोन राज्यांना ठरवावे लागतील. रेड तसेच ऑरेंज झोनमध्ये नियंत्रण क्षेत्र तसेच बफर झोन ठरवण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडून दिशानिर्देशानुसार निश्चित केले जाईल. नियंत्रण क्षेत्रामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच परवानगी देण्यात येईल. या झोनच्या आत तसेच बाहेर पडण्यास बंदी राहील.
काय बंद राहणार?
अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही व्यक्तीला रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत घराबाहेर पडता येणार नाही.
शाळा, महाविद्यालये, सर्व शैक्षणिक प्रशिक्षण संस्था बंद राहतील.
सर्व मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येतील.
सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक
यातून वैद्यकीय सेवा, एअर अॅम्ब्युलन्स, अत्यावश्यक सेवेसाठीची वाहतूक, सुरक्षा जवानांची ने-आण आदी बाबी वगळण्यात आल्या आहेत
हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर अतिथी सेवा बंद राहतील.
चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्वीमिंग पूल, मनोरंजनाची ठिकाणे, बार, ऑडिटोरिअम, असेम्ब्ली हॉल आदी ठिकाणे बंद राहतील.
सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकत्र जमण्यावरही बंदी.
सर्व धार्मिक स्थळे जनतेसाठी बंद राहतील.
काय चालू राहणार?
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक
आरोग्य, पोलीस, सरकारी कर्मचारी यांचे काम सुरू राहील. त्याचबरोबर ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांसाठी, पर्यटकांसाठी क्वारंटाईन सुविधा सुरू राहतील
केशकर्तनालये, सलून, स्पा यांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर झोनमध्ये परवानगी.
ई-कॉमर्स कंपन्यांना आता रेड झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचाही पुरवठा करता येईल.
रिक्षा, टॅक्सी आणि कॅबना रेड झोनमध्ये परवानगी.
बस डेपो, रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट या ठिकाणची कन्टीन सुरू राहतील
खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देण्यासाठी रेस्टॉरंटना त्यांचे स्वयंपाकघर सुरू ठेवण्यास मुभा
क्रीडा संकुले, स्टेडियम सुरू राहतील, मात्र प्रेक्षकांना बंदी
ऑनलाईन दूरस्थ शिक्षण सुरू.
बसेस आणि इतर वाहनांतून आंतरराज्य, केंद्रशासित प्रदेशातील वाहतूक कंटेन्मेंट झोन वगळता त्या त्या राज्यांच्या परस्पर सहमतीने सुरू ठेवण्यास परवानगी
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, आरोग्यसेविका, निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, अॅम्ब्युलन्स यांना अंतर्गत वाहतुकीस परवानगी
सर्व प्रकारची मालवाहतूक आणि रिकाम्या ट्रकना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाहतुकीस परवानगी
प्रतिबंध असलेल्या व्यवहारांखेरीज इतर व्यवहारांना परवानगी.
सलून्स, स्पा सुरू होणार
अॅप बंधनकारक
सर्व कर्मचार्यांना आरोग्यसेतू अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. कार्यालयात येणार्या प्रत्येक कर्मचार्याकडे हे अॅप असेल याची दक्षता घेण्याचे आदेश कार्यालयांना देण्यात आले आहे. नागरिकांना आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रोत्साहन देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.