• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीक कर्ज वाटपाचे सुलभीकरण करण्यासाठी जिल्हा ते ग्रामपातळीवर समित्यांचे गठन

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
80 1
0
rabi-crops
13
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१७- कोरोना (कोव्हीड-१९) विषाणूचा संसर्ग प्रादर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम- २०२० मध्ये पिक पेरणीसाठी जिल्ह्यातील सर्व कास्तकारांना शेतीसाठी लागणारा पीककर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा,तालुका व ग्राम पातळीवर पीक कर्ज वाटप सुलभीकरण समिती स्थापन केली असून शेतकऱ्यांना वेळीच पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी समित्यांनी काम करावे असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी (दि.१६) निर्गमित केले आहेत.
यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे की, पीक कर्ज पुरवठा वेळीच होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये सर्व कर्ज वाटप यंत्रणा तसेच अनुषांगीक विभाग यामध्ये समन्वय साधून शेतकऱ्याला आवश्यक सर्व कागदपत्रे उपलब्ध होवून वेळीच कर्जपुरवठा व्हावा यासाठी सातही तालुक्यामध्ये खालील प्रमाणे समितीचे गठन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय पिककर्ज वाटप सुलभीकरण समिती-
अध्यक्ष-जिल्हाधिकारी,
सदस्य- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला,निवासी उपजिल्हाधिकारी अकोला, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अकोला, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला, व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला, तहसिलदार अकोला,
सदस्य सचिव-जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला, -व्यवस्थापक,

तालुकास्तरीय पिककर्ज वाटप सुलभीकरण समिती-
अध्यक्ष-उपविभागीय अधिकारी, सदस्य-तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी, तालुक्यातील सर्व बॅंकांचे प्रतिनिधी.
सदस्य सचिव-सहाय्यक निबंधक / दुय्यम निबंधक सहकारी संस्था.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ग्रामस्तरीय पिककर्ज वाटप सुलभीकरण समिती-
अध्यक्ष-तलाठी, सदस्य- ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,ग्रामस्तरीय बँकाचे प्रतिनिधी,
सदस्य सचिव-कार्यकारी अध्यक्ष वि.का.से..सह. संस्था/ग्रामिण सेवा सह. संस्थेचे गट सचिव

या समितीने खालील प्रमाणे कामे करावीत-
१. कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सर्व बँकांनी तालुकास्तरीय समिती ( तहसिल कार्यालय) या ठिकाणी तात्काळ सादर करावी.
२. यादीचे संख्येएवढे कर्ज मागणीचे कोरे अर्ज बँकांनी यादीसह तहसिल कार्यालयात सादर करावे,
३. तहसील कार्यालय व तालुका निबंधक/ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी सदर याद्या गावांमध्ये प्रकाशित कराव्यात व कोरे अर्ज ग्रामस्तरीय समितीकडे सुपूर्द करावेत.
४. ग्रामस्तरीय समितीने गावामध्ये जावून शेतकऱ्यांचे अर्ज भरुन घ्यावेत. व आवश्यक ती कागदपत्रे उदा. ७/१२. गाव नमूना अ इत्यादी गावातच लावून घ्यावेत.
५. बँकानी त्यांचे प्रतिनिधी पाठवून गावातच असे परिपूर्ण अर्ज प्राप्त करुन घ्यावेत, यासाठी तालुका निबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी व बँकांनी गावात जावून अर्ज जमा करण्याचा कार्यक्रम निश्चित करुन प्रकाशीत करावा.
६. स्टॅम्प पेपरवर करावयाचे शपथपत्र हे नोटरी किंवा तहसिल कार्यालयामध्ये जावून करुन घेण्याची आवश्यकता नाही.बँकांनी पुर्वीच स्टॅम्प विकत घेवून बँकांकडे ठेवावेत व आवश्यकतेप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावेत व प्रकरणाला जोडावेत.
७. बँकानी शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्राची (no dues) मागणी करु नये. आवश्यक असेल तर बँकांनी आपसात मागणी करुन घ्यावेत.
८. कर्ज प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर व मंजूर केल्यानंतर असे दोनवेळा बँकांनी तालुकास्तरीय समितीला कळवावे.
प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , अकोला यांनी जिल्हास्तरिय समितीला कळवावे.
९. फेरफार प्रमाणपत्र नविन शेतकरी यांनाच आवश्यक असल्याने इतर नियमित (जुने) शेतकरी यांना फेरफार प्रमाणत्र लावण्याची
आवश्यकता नाही. तसेच ७/१२ व ८-अ मध्ये मागील कर्जप्रकरणानंतर बदल झालेला असेल तर फेरफार प्रमाणत्र आवश्यक असेल.
१०. ज्या बँकेमधून कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे त्या बँकेने कर्जवाटपाची प्रक्रिया प्राधान्याने करावी.
११. संपूर्ण कर्जवाटप प्रक्रिये दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुभाव फैलाव होवू नये मणून मास्क किंवा रुमालाने चेहरा झाकावा.
तसेच शारीरिक अंतर राखण्यासाठी सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील.
१२. समितीने सीसीआय मार्फत नोंदणी करण्यात आले आहे त्यांची १०० टक्के कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल याबाबत तालुकास्तरीय समितीने आवश्यक ती कार्यवाही करावी.
१३. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज माफी योजनेमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्याला खरीप हंगामामध्ये कर्ज पुरवठा होईल या बाबत तहसिलदार यांनी कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: crop loan
Previous Post

राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या लोकांना अलगीकरण अनिवार्य

Next Post

जिल्ह्यातील नागरिकांना १७ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निवेदन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
जिल्ह्यातील नागरिकांना १७ मे रोजी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निवेदन

जिल्ह्यातील नागरिकांना १७ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निवेदन

corona-image

अकोल्यात १०८ अहवाल १०४ निगेटिव्ह ४ पॉझिटिव्ह, एकूण आकडा २६१

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.