• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Media Desk by Media Desk
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
guardian-minister
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१४:  कोवीडबाधीत  रुग्ण हा मनाने खचलेला असतो.  त्या रुग्णाला  उत्तम उपचार देतांनाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक बळ देऊन  सर्वोत्तम सेवा द्या,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.

अकोला जिल्ह्यातील कोरोना फैलावाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी  रुग्णालयाची  पाहणी केली. तसेच  उपचार सुविधांबाबत तसेच कोवीड चाचणी केंद्राबाबत माहिती घेतली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसुले, डॉ. नेताम आणि डॉ. अनिल बात्रा तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी पालकमंत्र्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने उपचार सुविधा व रुग्णांच्या संसर्ग पातळीनुसार करण्यात येणारे वर्गीकरण सांगितले. यावेळी ना. कडू यांनी निर्देश दिले की, रुग्णांना वा संदिग्ध रुग्णांना नेमके कोठे जावयाचे आहे याबाबत उत्तम दिशानिर्देश असलेले फलक दर्शनी भागात लावावे. ‘सर्व उपचार व औषधी हे मोफत आहेत, विकत आणण्याची गरज नाही’ असेही फलक दर्शनी भागात लावावे. उपचार करणारे आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांचा ड्युटी चार्ट वेळेआधीच तयार असावा व तो ही दर्शनी भागात लावण्यात यावा. जेणे करुन येणाऱ्या रुग्णाला कोणत्या डॉक्टरांची ड्युटी आहे हे कळायला हवे.  वार्डनिहाय दाखल रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्या.  रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ व अन्य आवश्यकतांची माहिती यावेळी देण्यात आली. पुढ़ील काळात आवश्यकता भासल्यास आणखी  १२० खाटांची व्यवस्था असलेला वार्ड सज्ज आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

पालकमंत्री म्हणाले की, रुग्णांना सेवा देण्यासाठी  वार्डातील वातावरण स्वच्छ व चांगले ठेवून त्याची मनोवस्था सकारात्मक राहिल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Tags: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

तेलंगाणाला जाणाऱ्या ३३ मजूरांची दोन एस.टी. बसने रवानगी

Next Post

गोवंश चोरांना दहीहंडा पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
govansh-thief-arrested-police

गोवंश चोरांना दहीहंडा पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं

cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

राज्यात 'या' तारखेपर्यंत लॉक डाऊन वाढवणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.