• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

बाप रे …आज अकोल्यात एकाच दिवसात निघाले ४२ रुग्ण,कोरोनाबाधित १३७ वर

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Corona Featured, अकोला, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-update-breaking-news
18
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- आज रोजी सकाळी पॉझिटिव्ह रुग्ण १० निघाल्यानंतर सायंकाळी २४ रुग्ण निघाले होते मात्र सायंकाळी च्या अहवालानंतर पुन्हा ९ अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये ८ जण पॉझिटिव्ह निघाल्याने आज दिवसभरात कोरोना बाधित ४२ जण निघाल्याने अकोला करांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १९१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४९ अहवाल निगेटीव्ह तर ४२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या १३७ झाली  आहे. दरम्यान आज एका ७८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजअखेर प्रत्यक्षात १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १२८१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२६८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ११३१ अहवाल निगेटीव्ह तर १३७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  १३ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण १२८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०८४, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०७१ तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११३१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १३७ आहेत. तर आजअखेर १३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज प्राप्त झालेल्या १९१ अहवालात १४९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ४२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

एका वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू

आज एका ७८ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला  दि. १ रोजी दाखल झाली होती. दि. ५ रोजी तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान उपचार सुरु असतांना आज दुपारी तिचा मृत्यू झाला.

१११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत  १३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील बारा जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे  रोजी एकास  असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आज पॉझिटीव्ह आढळलेले रुग्णांपैकी २० जण बैदपूरा येथील आहेत तर मोह. अलि रोड, राधाकिसन प्लॉट, खैर मोहम्मद प्लॉट येथील तिघे, सराफा बाजार, अकोट फैल व जुने शहर येथील प्रत्येकी दोघे तर जुना तारफैल, गुलजार पुरा, आळशी प्लॉट, मोमिन पुरा, भगतसिंग चौक माळीपुरा, राठी मार्केट, काला चबुतरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आजअखेर १२२० प्रवासी आले आहेत. त्यापैकी ५८६ गृहअलगीकरणात व ९६ संस्थागत अलगीकरणात असे ६८२ जण अलगीकरणात आहेत. तर ४२१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर ११६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: akola corona infoakola corona newsakola corona positive
Previous Post

स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये – प्रकाश आंबेडकर

Next Post

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
essential things

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण

एसटी ST Bus

मागणी केल्यास एस.टी.बसची सेवा उपलब्ध रा.प. मंडळाची प्रवाशांसाठी सशुल्क सेवा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.