• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात

Media Desk by Media Desk
May 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कोविड १९, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
18
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु लॉकडाऊनमुळे महाविद्यालयीन, विद्यापीठांच्या परीक्षा सोबतच इतर स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम होते. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून संवाद साधला.

समितीने दिलेल्या अहवाला विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात येत आहे. जर राज्यात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली व लॉकडाऊन कालावधी वाढला तर पुन्हा एकदा २० जुन पर्यंत या विषयी फेर आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत असे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

समितीने केलेल्या शिफारशी नुसार ज्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्स ही त्यांना दिले जातील. ही मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी ५० टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत व ५० टक्के या पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांच्या बाबत १०० टक्के अंतर्गत मुल्यमापन करण्यात येणार आहे. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये मुल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दुर्दैवाने जर एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीचे वेळापत्रकाचे निर्णय ही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. हा निर्णय घेत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता येईल. असे ही सामंत यांनी संगित

विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरासन करून त्याच्या सामुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करण्यात येईल. अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी १ जुलै ते ३० जुलै दरम्यान परीक्षा होणार आहेत असे नजरेसमोर ठेऊन अभ्यास सुरू करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांनीही सुट्टी आहे, अभ्यास नाही म्हणून घरा बाहेर न पडता घरातच रहावे. उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करावयाचे आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करत आहे. समितीने दिलेल्या या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहमीती दर्शवली आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते असे गृहीत धरूनच त्यांची उपस्थित गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पडू नये व आपल्या अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लगणार आहेत.
चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार आहे.

तसेच पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ १० व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल.

ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल.

दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होईल.

गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भोगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ स्वतःच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेईल.

एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील इतर राज्यातील त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होतील.

उन्हाळी सुट्टीबाबत सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा विचार करून संबंधित विद्यापीठ अंतिम निर्णय घेईल. नवीन शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करण्यासाठी सर्व परीक्षांचे निकाल हे १५ ऑगस्ट पर्यंत लावण्यात येतील. सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) बाबतीत येत्या ८ दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल.

पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जर्नल किंवा ऑनलाईन ओरल घेऊन गुणांकन केले जाईल.

Tags: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतविद्यापीठ
Previous Post

दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करावा; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना

Next Post

अकोल्यात आणखी २४ कोरोनाबाधितांची भर,एक महिला मृत तर कोरोनाबाधितांची संख्या १२९

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola corona breaking news

अकोल्यात आणखी २४ कोरोनाबाधितांची भर,एक महिला मृत तर कोरोनाबाधितांची संख्या १२९

बाळापुर विधानसभा मतदार संघा

बाळापुर विधानसभा मतदार संघातील नागरीकांकरिता आमदार नितीन देशमुख यांच्या कडून ४५ हज़ार सॅनिटायझर बॉटल चे वाटप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.