अकोला (दीपक गवई)– 6 मे रोजी दुपारी बार्शीटाकळी येथील युवक पवन रामायने हा विद्रूपा नदीपात्रात खोलेश्वर मंदीराजवळ आंघोळीला गेला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेल्याने बुडाल्याची माहिती तेथे असलेल्या काही मुलांनी दीली. यावेळी एका मुलाने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही सांगण्यात आले परंतु त्यात यश आले नाही. ही माहिती मिळताच बार्शीटाकळीचे ठाणेदार तीरुपती राणे साहेबांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली आणी तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. तेव्हा लगेच पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी ओम साबळे, अंकुश सदाफळे,मयुर सळेदार,राहुल जवके,मयुर कळसकार,चेतन इंगळे, विशाल राऊत, आणी आपत्कालीन वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले लगेच पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी नदीचे लोकेशन ट्रेस केले असता आत मधे दहा ते बारा फुट खोल पाणी असुन यामध्ये मोठया प्रमाणावर गाळ असल्याचे समजले यामुळे वाॅटर सेप्टी बेल्ट लावुन लगेच सर्च ऑपरेशन चालु केले. एका तासात पवनचा मृतदेह शोधुन पोलिसांच्या ताब्यात दीला. यावेळी घटनास्थळी बा.पो.स्टे.चे ठाणेदार तीरुपती राणे साहेब हे आपल्या कर्मचा-यांसह जातीने हजर होते. रमेशभाऊ वाटमारे,गजाननभाऊ वाटमारे, गोपालभाऊ वाटमारे, भारत बोबडे, संतोषभाऊ राऊत, महेफुज खान,आणी नातेवाईक हे हजर होते.