अकोला (प्रतिनिधी)- अकोला जिल्हयात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना दुसरीकडे तापमानात सुद्धा झपाट्याने वाढ झाली असून पारा ४५℃ गेला आहे. जिल्हयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासी परेशान झाले आहेत दिवसागणित रुग्णांची भर पडत असल्याने नागरिकांच्या मनात धडकी भरली असून कोरोनाच्या या संकटातून बाहेर कधी पडू असे वाटू लागले आहे.
तर दुसरीकडे जिल्हयाचे तापमान हे ४५℃ च्या जवळपास गेले असून उन्हाचे चटके सुद्धा सहन करावे लागत आहेत. मात्र आता लॉकडाऊन असल्याने नागरिक घराच्या बाहेर पडत जरी नसले तरी ४५℃ तापमानाचा प्रभाव त्यांच्या वर दिसून येत आहे. शेतीच्या मशागतीचे कामे सुरू झाल्याने बळीराजाला मात्र शेतात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तरी शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळेस शेतामध्ये काम करू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी. जेणेकरून आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.