तेल्हारा (विशाल नांदोकार)- गेल्या काही दिवसात अकोला शहरात कोरोणाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता तालुका बंद करण्याची नितांत गरज आहे. परराज्यात गेलेले मजूर परतत असल्याने ग्रामस्थांनी खबरदारी घेऊन गाव बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. शिवाय गावबंदी, संचारबंदी, जमावबंदी आदी उपाययोजना करण्यात आले आहे. अकोला शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोणाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवा वगळता वाहने आणि प्रवासास बंदी लादण्याची गरज आहे. प्रशासनाने सुरुवातीला सॅनिटायझर स्प्रे ची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती.
परंतु, आता संपूर्ण जिल्ह्यात करून त्याचे रुग्ण वाढत असून सुद्धा शासनाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. तेल्हारा नगरपालिकेने सुरुवातीला सॅनीटायझर स्प्रेची फवारणी केली. परंतु सध्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून तेल्हारा तालुक्यात रुग्ण सापळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आरोग्य विभाग व नगरपालिका विभागाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच प्रशासनाकडे पुरी सेवक कर्मचारी नसल्याने तालुक्यामध्ये रस्ते किंवा अन्य मार्गाने लढत असलेल्या गावांना गावांमधील सेवाभावी संस्था मानसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ती सेवा समितीचे पदाधिकारी पोलीस पाटील यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पोलीस मित्र किंवा योद्धा या धरतीवर कार्ड वाटप करून नाकाबंदी करण्याची गरज आहे तसेच ग्रामीण भागातील युवक सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला सहकार्य करून कोणाला दूर ठेवण्यास मदत केली पाहिजे