• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आज व उद्या दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन फक्त वैद्यकीय सेवा वगळल्या; अधिक सतर्कतेचे आवाहन

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
80 0
0
strict-lockdown-akola
12
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३ – शासनाने दि. १७ पर्यंत वाढवलेल्या लॉक डाऊन कालावधी याबाबत  जिल्हा प्रशासनाने आज आदेश निर्गमित केले असून  त्यानुसार रविवार दि. ३ चे मध्यरात्रीपासून ते  मंगळवार दि. ५ च्या मध्यरात्रीपर्यंत अकोला महानगरपालिका हद्दीत संपूर्ण लॉक डाऊन  वैद्यकीय सेवा वगळता  लागू केला आहे. तर मनपा क्षेत्र वगळता अन्य भागात पुर्वीच्या आदेशाप्रमाणे लॉक डाऊनचे पालन होईल. तर नंतर मनपा हद्दीत सम तारखांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे तर विषम तारखांना संपूर्ण लॉक डाऊन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात आज निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. ३ ते दि.१७ मे पर्यंत लॉक डाऊन कालावधी वाढवण्यात आला आहे. या कालावधीत दि. ३ ते ५ दरम्यान अकोला मनपा हद्दीत  वैद्यकीय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवांसह बंद पाळण्यात येणार आहेत.  दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला  सकाळी सहा ते दहा व सायंकाळी चार ते सहा यावेळात अनुमती देण्यात आली आहे. तसेच दैनिक वृत्तपत्रांचे वितरण सुरु राहिल.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या कालावधीत मनपा हद्दीतील  सर्व बॅंका, एलआयसी इ. सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला मुक्त संचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुमतीने सुरु असलेले  मनपा हद्दीतील पेट्रोल व डिजेल पंप वगळून अन्य सर्व पंप बंद राहतील. नगरपरिषद व ग्रामिण भागातील पेट्रोल डिजेल पंप सुरु राहतील.   एमआय डीसी अकोला येथील परवानगी दिलेले उद्योग सुरु राहतील.  तथापि, नगरपरिषद व ग्रामिण भागाकरीता  पुर्वी दिलेले (दि.१९ एप्रिल) आदेश लागू राहतील.

सम तारखांना मर्यादित तर विषम तारखांना पूर्ण लॉक डाऊन

दरम्यान याच आदेशानुसार, सम तारखांना म्हणजे दि. ६, ८, १०, १२, १४ व १६ मे रोजी पुर्वीच्या (दि.१९ एप्रिल) आदेशाप्रमाणे  संचारबंदी कायम राहिल.  तर विषम तारखांना म्हणजेच दि. ७, ९, ११, १३, १५ व १७  तारखेला आज दिलेल्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय सेवा वगळता मनपा हद्दीत संपूर्ण लॉक डाऊन पाळण्यात येईल. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: lockdown in kaolastrict lockdown
Previous Post

६३ अहवाल प्राप्तः १५ पॉझिटीव्ह, दोन महिलांचा मृत्यू; दोघांना डिस्चार्ज

Next Post

वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची अधिक खबरदारी: बैदपूऱ्यात तात्पुरते क्वारंटाईन व घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
sanjay dhotre akola

वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची अधिक खबरदारी: बैदपूऱ्यात तात्पुरते क्वारंटाईन व घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा

covid-care-center-akola-telhara-patur-murtizapur

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे वसतीगृह अधिग्रहित

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.