• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

६३ अहवाल प्राप्तः १५ पॉझिटीव्ह, दोन महिलांचा मृत्यू; दोघांना डिस्चार्ज

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Corona Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
3 may corona report akola two death corona positive
42
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ६३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४८ अहवाल निगेटीव्ह  तर १५ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान  दोघा महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या सात झाली आहे.आज दुपारनंतर दोघांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण रुग्णांची संख्या १३ झाली आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ५५ झाली असून प्रत्यक्षात ३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ८८५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७९२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ७३७ अहवाल निगेटीव्ह तर ५५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ९३ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आजपर्यंत एकूण ८८५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७१४, फेरतपासणीचे ९४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६२१ तर फेरतपासणीचे ९४ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७७ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५५ आहेत. तर आज अखेर ९३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज प्राप्त झालेल्या ६३ अहवालात ४८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १५ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

आता सद्यस्थितीत  ५५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील सात जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि आज (रविवार दि.३ मे) दोघांना  असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान   आज  पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या दोघा महिलांचे निधन दि.१ व दि. २ रोजी झाले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले, त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी होत्या, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

एकाच दिवशी १५पॉझिटीव्ह

आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा १२ जण तर सायंकाळी सहा वाजता प्राप्त अहवालात तिघे जण,  असे दिवसभरात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या  १२ रुग्णांपैकी दोन महिला या दि.१ व दि.२ रोजी मयत झाल्या. तर उर्वरीत दहा जणांपैकी तिघे मोमीनपुरा, पाच जण बैदपुरा तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात तिघे पॉझिटीव्ह रुग्ण असून त्या तिनही महिला आहेत. त्यात एक महिला ही न्यू भिमनगर येथील तर अन्य दोन्ही महिला या  बैदपूरा येथील रहिवासी आहेत.

दोघांना डिस्चार्ज

दरम्यान,आज बैदपुरा येथील दोघांना  पुर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ही दोघे भावंडे असून  या आधीच्या एका मयत रुग्णाची अपत्ये आहेत. त्यांना आज रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सने टाळ्या वाजवून निरोप दिला.

दरम्यान आजअखेर ८५६ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३२४ गृहअलगीकरणात व १६६ संस्थागत अलगीकरणात असे ४९० जण अलगीकरणात आहेत. तर २४६ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १२० रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: corona death akolacorona patient died
Previous Post

जिल्ह्यातील कोरोनाची सध्यस्थिती पाहता..अकोल्यात उद्यापासून दोन दिवस पूर्णत: लॉकडाउन – जिल्हाधिकारी पापळकर.

Next Post

आज व उद्या दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन फक्त वैद्यकीय सेवा वगळल्या; अधिक सतर्कतेचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
strict-lockdown-akola

आज व उद्या दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन फक्त वैद्यकीय सेवा वगळल्या; अधिक सतर्कतेचे आवाहन

sanjay dhotre akola

वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची अधिक खबरदारी: बैदपूऱ्यात तात्पुरते क्वारंटाईन व घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.