• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दवाखाने सुरु करा; अन्यथा सेवा अधिग्रहित करु- जिल्हाधिकारी पापळकर यांचा खाजगी डॉक्टर्सना इशारा

Team by Team
May 1, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
Papalkar meeting
23
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१ – कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. त्यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स आपले दवाखाने, रुग्णालये सुरु ठेवतील असे अपेक्षित होते. मात्र तसे होतांना दिसत नाही. अशा या आपत्तीच्या प्रसंगी खाजगी डॉक्टर्सने आपले दवाखाने, रुग्णालये तात्काळ सुरु करुन कोरोना संसर्ग प्रतिबंधाची उपाययोजना करुन रुग्णसेवा सुरु ठेवावी,अन्यथा खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करण्याच्या पर्यायाचा अवलंब प्रशासन करेल असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज झालेल्या डॉक्टर्सच्या बैठकीत दिला.

जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सने त्यांच्या सेवा सुरु करुन समाजात दिसणारे संशयित कोवीड रुग्ण ओळखून ते शासकीय रुग्णालयांकडे तात्काळ पाठवावे यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक आय एम ए या डॉक्टर्सच्या संघटनेसमवेत झाली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधे मेतकर तसेच अन्य अधिकारी व आय एम ए या संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.

या बैठकीत सुरुवातीला उपस्थित डॉक्टरांनी आपल्या अडचणी मांडल्या. तसेच त्यांनी केलेल्या सुचना व त्यांच्या समस्याही मांडण्यात आल्या. यावेळी काही डॉक्टर्सने कम्युनिटी दवाखाने वेगवेगळ्या भागात सुरु करण्याबाबतचा उपायही सुचविला. तसेच ६० वर्षे वयावरील डॉक्टर्सना या अत्यावश्यक सेवेतून वगळावे, इन्श्युरन्स सुरक्षा द्यावी , प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी वर्ग येऊ देण्याबाबत, अत्यावश्यक साहित्य व औषधे मिळण्याबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत समस्या मांडल्या.
त्यांच्या समस्यांच्या तांत्रिक बाबिंबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण व अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. घोरपडे म्हणाले की, खाजगी डॉक्टर्सने समाजातील कोरोना रुग्ण ओळखून त्याच्या बाबत शासकीय रुग्णालयाला कळविण्याचे काम करावे. आपल्या रुग्णालयात काम करतांना त्यांनी मास्क, हॅण्डग्लोव्हज,सॅनिटायझर व कॅप वापरावे. ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण अशा लक्षणांचे रुग्ण आल्यास त्याबाबत कळवावे, जेणेकरुन त्यांचेवर वेळीच उपचार सुरु होतील. खाजगी डॉक्टर्स आपली सेवाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देऊ शकतात. सोबत या आणि शासनासोबत काम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले की, प्रशासन, शासकीय आरोग्य यंत्रणा, आणि खाजगी डॉक्टर्स यांनी सहकार्याने काम केल्यास आपण कोरोनाला हद्दपार करु शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनपा आयुक्त संजय कापडणीस म्हणाले की, कोरोना रुग्णांचा शोध घेणे, त्यांचेवर वेळीच उपचार होणे यासाठी डॉक्टर्सने आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कोरोना व्यतिरिक्तही अन्य आजार आहेत? त्या रुग्णांना सेवा कशी मिळणार? समाजातील मधुमेह, अस्थमा, दमा अशा विकारांचे रुग्ण अधिक धोक्यात असतात. त्यांना संसर्गाची जास्त भिती असते. अशा रुग्णांना सेवा वेळीच दिली गेली पाहिजे. या सेवेकडे सामाजिक दृष्टीकोनातून बघावे, असे आवाहन त्यांनी केले. आपण आपल्या ज्ञानाचा वापर करुन समाजाचे, रुग्णाचे मनोधैर्य वाढवू शकता, त्या जबाबदारीच्या भावनेतून काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, खाजगी डॉक्टर्सना औषधे, सॅनिटायझर, साहित्य यांचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. डॉक्टर्सने आपला दवाखाना उघडणे आवश्यक आहे. काही डॉक्टर्स नावाला दवाखाना उघडून कंपाऊंडरला बसवून आलेल्या रुग्णांना परत पाठवत आहेत, हे अयोग्य आहे. कुठल्याही प्रकारे आलेला पेशंट जर संदिग्ध रुग्ण वाटला तर त्याला वाऱ्यावर न सोडता त्याला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या हवाली करणे ही आपली साऱ्यांची सामाजिक, नैतिक जबाबदारी व राष्ट्रीय कर्तव्य आहे. डॉक्टर्सने सुचविलेल्या कम्युनिटी दवाखाने या कल्पनेचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले. ही कल्पना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासन दिले. डॉक्टरांच्या अन्य मागण्यांबाबत शासनाच्या निर्देशानुसार कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्या शहरात, जिल्ह्यात आपण शिकलो, वाढलो, अनेक वर्षे प्रॅक्टीस केली त्या शहराचे, समाजाचे आपण देणे लागतो या सामाजिक जाणीवेतून डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु करावेत. अन्यथा प्रशासनाकडे सर्व डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्याचाही पर्याय आहे, असा इशाराही त्यांनी दिला. या सभेचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला;निवडणूक आयोगाची परवानगी

Tags: आयुक्त संजय कापडणीसउपजिल्हाधिकारी संजय खडसेजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

Big Breaking : देशव्यापी लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविला

Next Post

‘ऑनलाईन’ वैद्यकीय सल्ल्यासाठी आरोग्य विभागाची ‘ई-संजिवनी’

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
केंद्रीय आरोग्य मंत्रालय

‘ऑनलाईन’ वैद्यकीय सल्ल्यासाठी आरोग्य विभागाची ‘ई-संजिवनी’

असा असेल नवा लॉकडाउन ३; काय सुरु काय बंदच

असा असेल नवा लॉकडाउन ३; काय सुरु काय बंदच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.