मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असता, कोरोनामुळे पुढे ढकललेल्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार निश्चित विजय प्राप्त करणार आहे. त्यामुळे एन कोरोनाच्या संकटकाळी राज्यातील राजकीय वातावरण वेगळ्या दिशेला जाणार की काय? अशा राज्यात रंगलेल्या चर्चेच्या फडला पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहा पैकी एकाही सभागृहाचे सदस्य नसतांना 28 नोव्हेम्बर 2019 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र पुढील सहा महिन्यात म्हणजेच 27 मे 2020 पर्यन्त त्यांना दोन पैकी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवणे बंधनकरक होते. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असता. परन्तु महाविकास आघाडीने निर्णय घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त असलेल्या दोनपैकी एका जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी असा निर्णय घेतला. त्यानुसार राज्याच्या मंत्रीमंडळाने निर्णय घेवून ठाकरेंच्या नावाची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.
परंतु काही आठवडे उलटल्यानंतरही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय न घेतल्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते.यावर विरोधी पक्षनेही उत्तर देत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापवाण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. हे होत असतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्रिमंडळाच्या शिफारशिवर निर्णय न घेता पुढे ढकलेल्या विधान परिषदेच्या 9 जागांची निवडणूक घेण्यासाठी 30 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. यामुळे राज्यातील राजकीय पेच आणखी वाढायला सुरुवात झाली.
मात्र 1 में रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रावर चर्चा करुण निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला.
निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या पत्रानुसार
विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागेसाठी 4 मे रोजी परिपत्र जाहिर करण्यात येणार आहे.11 मे पर्यन्त उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून 12 में रोजी स्क्रूटनी करण्यात येणार असून 14 में रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कालावधी ठरवून दिला आहे. 21 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतदान तर त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
निवृत्त झालेले सदस्य
1. नीलम गोरे (शिवसेना)
2.हेमंत टकले (राष्ट्रवादी)
3. आनंद ठाकुर(राष्ट्रवादी)
4.स्मिता वाघ (भाजप)
5.पृथ्वीराज देशमुख (भाजप)
6.किरण पावसकर (राष्ट्रवादी)
7.अरुण अडसड (भाजप)
8.चंद्रकांत रघुवंशी (कॉंग्रेस)
9.हरिसिंग राठोड (कॉंग्रेस )