• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांच्या तपासणीचे नियोजन करा-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in अकोला जिल्हा, Featured, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
bachu-kadu-akola-meeting
22
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३०– कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन कालावधीत अन्यत्र अडकलेल्या लोकांना आता त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत दिशानिर्देश आले आहेत. तथापि, हे लोक आपापल्या गावी परतल्यानंतर त्यांच्या पोहोचण्याची, आरोग्य तपासणी, अलगीकरण आदी व्यवस्थांचे परिपूर्ण नियोजन करा, असे निर्देश राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात आज कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी घेतला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई  भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. गोपिकिशन बाजोरिया,आ. गोवर्धन शर्मा, आ. नितीन देशमुख, आ. रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे,  राज्य उत्पादन शुक्ल अधिक्षक स्नेहा सराफ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

 यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात १८२ पथकांच्या द्वारे १७ हजार ८८४ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ५१ ठिकाणी फिव्हर क्लिनिक तयार करण्यात आले असून त्यात आजतागायत ९६८५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या गरोदर महिलांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वतंत्र  प्रसुती वार्ड तयार करण्यात आल्याची खबरदारी घेण्यात आली आहे, अशी ही माहिती देण्यात आली.

यावेळी ना. कडू म्हणाले की, जिल्ह्यात आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबई पुणे वा देशातील अन्य भागात अडकलेले लोक येण्याची सुरुवात होईल. हे लोक येण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने परिपूर्ण तयारी करावी.

Tags: akola corona
Previous Post

सर्दी-खोकला, तापासाठी औषध घेतांना दुकानदाराला माहिती द्यावी: अन्न औषध प्रशासन विभागाचे आवाहन

Next Post

चार लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत खरीपाच्या नियोजनास मान्यता

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कापूस

चार लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत खरीपाच्या नियोजनास मान्यता

30-april-corona-update-akola

३१ अहवाल प्राप्तः३० निगेटीव्ह तर एक पॉझिटीव्ह; तिघांना घरी सोडले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.