अकोला,दि.३०(जिमाका)- कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या संसर्गाचा शोध घेण्यासाठी व वेळीच उपचार करता यावे यासाठी जिल्ह्यातील सर्व मेडीकल दुकानदारांनी त्यांच्याकडे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांसाठी औषधे घेणाऱ्या ग्राहकांनी दुकानदारांना माहिती देणे आवश्यक आहे. त्याकरीता ग्राहकांनी आपला संपर्क क्रमांक, पत्ता मेडीकल दुकानदाराकडे नोंदवावा. अशा नोंदींचा दररोजचा अहवाल मेडीकल दुकानदारांकडून दररोज प्रशासनाकडे मागविण्यात येतो. तरी नागरिकांनी याबाबत मेडीकल दुकानचालकास आपली माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहा. आयुक्त औषधे हे. य. मेतकर यांनी केले आहे.