• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आणखी पाच नवे पॉझिटीव्ह; एका महिलेचा मृत्यू

Team by Team
April 30, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 0
0
( व्हिडिओ) कोरोना ब्रेकिंग – अकोला जिल्हात कोरोनाचा पहिला रुग्ण
11
SHARES
553
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.२९- आज सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ३५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३० अहवाल निगेटीव्ह तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आहेत आले. नव्याने पॉझिटीव्ह आढळेल्या पाच पॉझिटीव्ह रुग्णात एका मयत महिलेचा समावेश असून अन्य चार हे दीपक चौक परिसरातील रहिवासी आहे. हे चौघे एकाच कुटूंबातील सदस्य आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६४९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५९५ अहवाल निगेटीव्ह २७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ३२ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आजपर्यंत एकूण ६४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२१, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९६ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५९५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २७ आहेत.

आज प्राप्त झालेल्या ३५ अहवालात ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाच पॉझिटीव्ह आहेत. निगेटीव्ह अहवालात सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील आठ जणांच्या अहवालाचाही समावेश आहे. सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील ५४ जणांची तपासणी आज पर्यंत झाली असून त्यातील ५० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता फक्त चार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.

सायंकाळी उशीरा आलेले पाचही अहवाल पॉझिटिव्ह

आज सायंकाळी सात वाजता प्राप्त पाच अहवालांत पाचही जण पॉझिटीव्ह आले आहेत. यात बैदपूरा भागातील महिलेचा समावेश आहे. ही महिला अत्यवस्थ अवस्थेत दि. २८ रोजी दुपारी रुग्णालयात दाखल झाली. दाखल झाल्यावर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आता सायंकाळी प्राप्त झाला. तो पॉझिटीव्ह आला. त्यानंतर उर्वरित चार जणांचे अहवाल ही पॉझिटीव्ह आले. हे चौघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. ते दीपक चौक परिसरात कलाल ची चाळ येथील रहिवासी आहेत. या कुटुंबातील एक सदस्य हा प्रशासनाने सुरु केलेल्या रेड क्रॉस संचलित फिव्हर क्लिनिक मध्ये गेला होता. तेथे त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ते सर्व जण आलेही. मात्र ते लगेच निघून गेले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मनपा, प्रांताधिकारी व पोलीस यांच्या सहाय्याने त्यांना घरून आणले. त्यांचे नमुने घेतले. आजच्या अहवालात ते चौघेही पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ

जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या २७ आहे. त्यात तिघे मयत आहेत. गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आजअखेर १६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, आजपर्यंत दाखल प्रवाशी संख्या ६५५ असून २८९ गृह अलगीकरणात तर ८४ हे संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३७३ अलगीकरणात आहेत. आतापर्यंत २४० जणांची गृह अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत संपली आहे. तर विलगीकरणात ४१ रुग्ण दाखल आहेत. आज नव्याने तीन संदिग्ध रुग्ण दाखल झाले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Tags: Akolanewsकोविड १९
Previous Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ८२ हजार रुपये

Next Post

मोठा निर्णय : लॉकडऊनमुळे अडकलेल्या कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना घरी जाता येणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Coronavirus lockdown

मोठा निर्णय : लॉकडऊनमुळे अडकलेल्या कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना घरी जाता येणार

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध

प्रतिबंधित क्षेत्रातील मृत्युची माहिती कळविणे बंधनकारक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.