• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आज प्राप्त ४५ अहवालांपैकी पाच ‘नवे पॉझिटीव्ह’

Team by Team
April 30, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola-corona-update-3-april-2020
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२८– आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातले ३९ अहवाल निगेटीव्ह तर अन्य सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. संसर्ग तपासणीचे ४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातले ३९ अहवाल निगेटीव्ह तर अन्य सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील एक अहवाल हा फेरतपासणीचा असून उर्वरित पाचही जणांचे प्राथमिक अहवाल आहेत. आता पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २२ झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ५९९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५८७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५६५ अहवाल निगेटीव्ह २२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व १२ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

आजपर्यंत एकूण ५९९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४७३, फेरतपासणीचे ८५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५८७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४६४ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३८ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५६५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २२ आहेत.

आज प्राप्त झालेल्या ४५ अहवालात ३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील पाच हे प्राथमिक तपासणीचे असून अन्य एक हा फेरतपासणीचा अहवाल आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या २२ झाली आहे. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आज नव्याने पाच पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे आजअखेर १२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान फेरतपासणीतही पॉझिटीव्ह अहवाल आलेला रुग्ण हा बैदपूरा भागातील तीन वर्षीय बालक आहे.

पाचही पॉझिटिव्ह सिंधी कॅम्पातील रुग्णाच्या संपर्कातील

रविवारी (दि.२६) पॉझिटीव्ह आढळलेल्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल ४७ जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ४१ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यात पाच जण पॉझिटीव्ह तर अन्य ३६ जण निगेटीव्ह आले आहेत. यातले पाच ही नवे पॉझिटीव्ह रुग्ण हे याच रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यात या रुग्णाची पत्नी, दहा वर्षाचा मुलगा, वहिनी व दोघे नोकर (कृषि नगर जवळील न्यू भीमनगर व खदान परिसरातील) असे हे पाच जण आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

रविवारी (दि.२६) पॉझिटीव्ह आढळलेल्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल ४७ जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी पाच जण आज पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील तिघे हे रुग्णाच्या कुटुंबातीलच सदस्य आहेत. तर अन्य दोघे नोकर असून ते कृषिनगर परिसरातील न्यू भिमनगर व खदान अशा भागात रहातात. त्यामुळे आता प्रतिबंधित क्षेत्रात कृषिनगर, न्यू भिमनगर या भागाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सिव्हील लाईन परिसरातील जेएमडी मार्केटचा काही भागही आता सिल करण्यात आला असल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिले आहेत. तसेच या भागात आता मनपाची १५ पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे.

३५ जण संस्थागत अलगीकरणात स्थलांतरीत

दरम्यान, आजपर्यंत दाखल प्रवाशी संख्या ६२८ असून २४४ गृह अलगीकरणात तर ९४ हे संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३३८ अलगीकरणात आहेत. आतापर्यंत २४० जणांची गृह अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत संपली आहे. तर विलगीकरणात ५० रुग्ण दाखल आहेत. आज नव्याने आठ संदिग्ध दाखल झाले आहेत. तर आज सायंकाळी ३५ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील संस्थागत अलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Tags: Akolanewsकोविड १९
Previous Post

वाळू माफियांची बातमी प्रकाशीत केली म्हणून वाळू माफियांनी केला पत्रकारावर प्राणघातक हल्ला

Next Post

खाजगी दवाखाने तपासणीसाठी पथक गठीत करा- जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध

खाजगी दवाखाने तपासणीसाठी पथक गठीत करा- जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

आधार

सेवायोजन कार्डाचे आधार संलग्न करण्याचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.