अकोला(प्रतिनिधी): सलग पंचवीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अकोला जिल्ह्यात दि.१३ सप्टेबर १९१५ ला स्थापन झालेल्या शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळाच्या दहावे राष्ट्रीय शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य संमेलन जाहीर करण्यात आले असून ऑगस्ट २०२० मध्ये गोवा राज्यातील पणजी येथे भव्य प्रमाणात साजर्या होणार्या या राष्ट्रीय साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक शिवचरण उज्जैनकर यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती शुभम चे संस्थापक,अध्यक्ष आतिश सुरेश सोसे,सचिव प्रा.दीपाली सोसे,उपाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे,प्रशांत मानकर,कार्याध्यक्ष विनोद उबाळकर,संजय वानेरे,कोषाध्यक्ष संदीप फासे,दिनेश छबिले आणि सुप्रसिध्द साहित्यिक,वक्ते प्रा.डाॅ.श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्र्टभर आपल्या साहित्यसेवेच्या विस्तारानंतर महाराष्र्टाबाहेर प्रथमच गोवा राज्यात होणार्या या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन वेगवेगळ्या राज्यात करुन त्या माध्यमातून ‘मराठी’भाषेतील साहित्यिकांची गौरवगाथा राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या उदात्त हेतुने ही सुरुवात करीत असल्याचे शुभम परिवाराने सांगितले आहे.
अशा या अत्यंत मानाच्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड करण्यात आली आहे,ते सुप्रसिध्द साहित्यिक शिवचरण उज्जैनकर मागील दोन दशकांपासून साहित्य लेखन व साहित्य सेवा करीत आहेत.जळगाव खानदेश मधील मुक्ताईनगर येथे स्थायिक झालेले शिवा सर म्हणून सर्वत्र परिचित आहेत.आजवर त्यांची इयत्ता ५ वी ते ७ वी ‘इंग्रजी ग्रामर’ व इयत्ता ८ वी ते १० वी ‘इंग्रजी ग्रामर’ तसेच सातशे पृष्ठांचे ‘पंखपिसारा’हे पुस्तक अशी तीन पुस्तके प्रकाशित झाली असून ‘निवडक पंखपिसारा,त्यांचे साहित्य व त्यावरील समीक्षणे’यांसह दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.त्यांनी काही अंकांचे संपादनही केले आहे.दोन अखिल भारतीय स्तरावरील अंकुर साहित्य संमेलनांच्या आयोजनासोबतच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन च्या माध्यमातून शंभरहून अधिक साहित्यिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘राज्यस्तरीय तापी पूर्णा पुरस्कार’देऊन त्यांनी सन्मानपूर्वक गौरविले आहे.बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये समीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.साहित्य क्षैत्रासोबतच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचेही आठ वर्षे काम पाहत भ्रष्टाचार निर्मूलनासोबतच मोफत नेत्ररोगनिदान शिबिरे,बालसंस्कार शिबिरे,साने गुरुजी कथामाला,रोजगार मेळावे,कुक्कुटपालन शिबिरे यासह अनेक सामाजिक उपक्रमांचेही यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे.’लावण्याची चंद्रकोर’या मराठी चित्रपट निर्मितीतही त्यांचे मोलाचे योगदान आहे.आजवर त्यांच्या पुस्तकाला मिळालेल्या स्व.सूर्यकांतादेवी पोटे राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार,अमरावतीसह,स्व.विमलाबाई कुकडे पुरस्कार,दानापूर,अंकुररत्न पुरस्कार,मुक्ताईनगर,राज्यस्तरीय शुभम कार्यगौरव पुरस्कार,धुळे,राज्यस्तरीय आदर्श कर्मचारी पुरस्कार,जळगाव,महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार,औरंगाबाद,गुणवंत शिक्षक पुरस्कार,नाशिक,राष्र्टसंत तुकडोजी महाराज आश्रम,गुरुकुंज मोझरी येथील ‘सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार,राष्ट्रीय मानवाधिकार सन्मान,नागपूर अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.अशा नामवंत आणि खर्या अर्थाने साहित्य सेवा केलेल्या साहित्यिकांचा सन्मान असून त्यांच्या निवडीबाबत सर्वच क्षेत्रांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.