• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

पत्रपरिषद :कोरोनाबाबत खबरदारी म्हणून राज्यातील सहा कारागृह लॉक डाऊन-गृहमंत्री ना. अनिल देशमुख

Media Desk by Media Desk
May 2, 2020
in विदर्भ, Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
anil deshmukh
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (जिमाका)- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील सहा कारागृह खबरदारीचा उपाय म्हणून  लॉक डाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पालघर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून याघटनेची उच्चस्तरीय चौकशी शासनाने सुरु केली आहे. शिवाय पोलीस चौकशी दरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली.

कोरोना सद्यस्थितीबाबत अकोला जिल्ह्याचा आज ना. देशमुख यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान,  इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  पोलीस अधिक्षक अमोघ गावकर उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सहा तुरुंगांचे लॉक डाऊन

यावेळी ना. देशमुख यांनी माहिती दिली की, राज्यात सहा ठिकाणचे तुरुंग क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने हे तुरुंग लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या तुरुंगात बाहेरची कोणीही व्यक्ती आत जाणार नाही व आतली व्यक्ती बाहेर जाणार नाही, असे ना. देशमुख यांनी स्पष्ट केले.

संचारबंदीचे कडक पालन

यावेळी ना. देशमुख यांनी माहिती दिली की, राज्यात संचारबंदीचे कडक पालन व्हावे यावर शासनाने भर दिला आहे. संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून ५७ हजार ५१७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून  क्वारंटाईन केले असतांनाही बाहेर  फिरतांना आढळले म्हणून ५७२ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.  पोलिसांचा १०० या क्रमांकावर आतापर्यंत ७४ हजार ३४४ कॉल या कालावधीत आले असून त्यांना मदत करण्यात आली आहे.  अत्यावश्यक आवागमनासाठी आतापर्यंत दोन लाख १७ हजार पासेस देण्यात आले. तर अवैधरित्या  वाहतुक केल्याप्रकरणी  १०५१ गुन्हे दाखल झाले आहेत. अकारण संचारबंदीचे आदेश मोडून बाहेर फिरणाऱ्या ४० हजार ४१४ गुन्हे दाखल झाले असून आता तर त्यांचे वाहन ही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही ना. देशमुख यांनी सांगितले.

फेक न्यूजबाबत कडक धोरण

सोशल मिडीयातून प्रसारित संदेशाद्वारे सामाजिक वातावरण खराब केल्याप्रकरणी २४२ गुन्हे दाखल झाले आहेत.  फेक न्यूजबद्दल राज्य शासनाने कडक धोरण अवलंबिले असल्याचे सांगून असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत असे ना. देशमुख यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यात तब्लिगीचा कार्यक्रम शासनाने धोका ओळखून रद्द करायला लावला.  राज्यातील कोरोना संदर्भातील परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालघर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरु

पालघर येथे झालेली घटना ही दुर्दैवी असून अफवा पसरल्याने विनापरवानगी दुसऱ्या राज्यातून आलेल्या दोघांवर जमावाने हल्ला केला. यावेळी तेथे पोलीस संख्याबळाने कमी होते. नंतर जादा कुमक गेली. पोलीसांनी जमावाला पांगवण्याची कारवाई केली असल्याची माहिती ना. देशमुख यांनी  दिली. सध्या या प्रकरणी सुमारे १०० जणांना अटक करण्यात आली आहे. उच्चस्तरीय चौकशीस सुरुवातही झाली असुन  अहवाल येताच त्यावर कारवाई होईल, असेही ना. देशमुख यांनी स्पष्ट केले.

वृत्तपत्र वितरणाबाबत समिक्षेनंतर निर्णय

वृत्तपत्र वितरणासंदर्भात  केंद्रीय आरोग्य विभागाच्या  मार्गदर्शक सुचनांनुसार केवळ घरोघर वाटप करण्यावर बंदी आहे.  तथापि, स्टॉल्सवर विक्री करण्यास बंदी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत  लवकरच या मार्गदर्शक सुचनेची वरिष्ठ पातळीवर समिक्षा करुन निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.

Tags: गृहमंत्री ना. अनिल देशमुख
Previous Post

कोरोनाच्या कहरात ग्रामीण भागात तोतया पोलीस म्हणून धूमाकूळ घालणाऱ्या चार आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

आजच्या २१ पैकी सर्व अहवाल निगेटीव्ह; आजपर्यंत ४१४ अहवालांपैकी ३९८ निगेटीव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola-corona-update-3-april-2020

आजच्या २१ पैकी सर्व अहवाल निगेटीव्ह; आजपर्यंत ४१४ अहवालांपैकी ३९८ निगेटीव्ह

Anil Deshmukh meeting

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने लोकांना दिलासा द्यावा-गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी घेतला कोरोना सद्यस्थितीचा आढावा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.