अकोला,दि.१३ (जिमाका)- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर संदिग्ध रुग्ण वा कोवीड पॉझिटीव्ह रुग्णांच्या थेट संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही संबंधित व्यक्तींना किमान १४ दिवस निरीक्षणात व अलगीकरण करुन ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी तालुकास्तरावर व अकोला शहरात असे मिळून सात ठिकाणी १४ कोवीड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून त्यातून ११५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात समन्वय अधिकारी व वैद्यकीय समन्वय अधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
कोवीड केअर सेंटर, खाटांची संख्या, वैद्यकीय समन्वय अधिकारी व समन्वय अधिकारी याप्रमाणे-
अकोला-
१) डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील कृषक भवन (८० खाटा),
२) कृषि यांत्रिकी भवन (२०)
३) शिवनेरी वसतीगृह (१४०)
या तीनही सेंटरचे वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. मधुकर राठोड (९४२३३७४७४९) हे असून समन्वय अधिकारी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार हे आहेत.
अकोट-
१) आयटीआय वसतीगृह, अकोट (४०)
२) गजानन महाराज विहीर संस्थान अकोली, जहांगीर (४०)
या दोनही सेंटरसाठी वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. एस.बी. तोरणेकर (७०२०७८७७३३) हे असून समन्वय अधिकारी अकोट चे उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी हे आहेत.
तेल्हारा-
१) विपश्यना केंद्र खापरखडा(६०)
२) तहसिल नवीन इमारत (४०)
३) नगरपरिषद सभागृह (४०)
या तिनही सेंटरसाठी वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. तापडीया (९१४६००५८०१) व डॉ. प्रविण चव्हाण (९८२३०७३४७५) हे असून समन्वय अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार हे आहेत.
बाळापूर-
मुलींची निवासी शाळा शेळद (२००) वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. भावना हाडोळे (७८७५२६९९९९), समन्वय अधिकारी उपविभागीय अधिकारी बाळापूर रमेश पवार
पातूर-
डॉ. ढोणे डब्ल्यूएस कॉलेज, पातूर (१५०) वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. विजय जाधव (९४२२१६१८६८), समन्वय अधिकारी महसूल उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे.
मुर्तिजापूर-
१) शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (१८०)
२) समाज कल्याण इमारत (७०)
या दोन्ही सेंटरसाठी डॉ. एम.डी. राठोड (८७६६५८९७९८) हे वैद्यकीय समन्वय अधिकारी आहेत तर उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते हे समन्वय अधिकारी आहेत.
बार्शी टाकळी-
१)ग्रामीण रुग्णालयाचे निवासस्थान (५०)
२) समाजकल्याण वसतीगृह (४०)
या दोन्ही सेंटरचे वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. मनिष शर्मा आहेत तर समन्वय अधिकारी रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे हे आहेत.
या सर्व सेंटर्स मिळून ११५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणि आरोग्य विषयक, भोजन , चहापान. तसेच सुरक्षा व्यवस्था व स्वच्छता , पाणीपुरवठा आदींबाबत व्यवस्था ठेवण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देशीत करण्यात आले आहे.