• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शासनाच्या मोफत धान्य वाटपामुळे गोरगरिबांना दिलासा मात्र एकाच वेळी गर्दी होत असल्याने वाढत्या धोक्याला निमंत्रण

Team by Team
May 4, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
due to free rashan
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: (विशाल नांदोकार) राज्यात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन प्रथम टप्प्यात 14 एप्रिल पर्यंत गेले. अशातच शासनाने स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती ती आता प्रत्यक्षात अमलात आली असून तेल्हारा तालुक्यात धान्य वाटपाचा मुहूर्त साधण्यात आला आहे. परंतु एकाच वेळी सर्वांना धान्य मिळत असल्यामुळे धान्य दुकानावर गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमाचा फज्जा उडवल्या जात आहे. मात्र या धान्य वाटपामुळे गरजू गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्यात कोरोणाचा प्रसार झाल्यानंतर लगेच लॉकडाऊनला सुरुवात झाली, त्यामुळे प्रशासनाने युद्धस्तरावर प्रतिबंध करण्यासाठी योजना आखल्या. एप्रिल महिन्याचे रेशन मार्च महिन्यातच प्रत्येक गावापर्यंत पोचवण्यात आले. दरम्यान एप्रिल मे व जून या तीन महिन्याचे रेशन लाभार्थ्यांना एकत्रितपणे मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यातच रेशन कार्ड वरील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ देण्याचीही घोषणा झाली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

एप्रिल महिन्याच्या प्रारंभी जेव्हा लाभार्थी रेशन दुकानात रेशन घेण्याकरिता गेली असता त्यांना नेहमीप्रमाणेच धान्य मिळाली. तीन महिन्याची एकत्रित रेशन न मिळता केवळ एप्रिल महिन्याचे राशन देण्यात आले. त्यात लाभार्थ्यांना गहू तांदूळ व्यतिरिक्त दाळ साखर मिळते. त्यात डाळ साखरेलाही या महिन्यात खो देण्यात आला आहे. वास्तविक पाहता लॉकडाऊन नसताना रेशनच्या लाभार्थ्यांना दुकानातून हवे तसे धान्ये व डाळी प्राप्त झाल्या. मात्र, लॉकडाऊनच्या अत्यावश्यक काळात ग्रामीण जनतेला डाळ साखर यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील जनता लॉकडाऊनमुळे होरपळून निघाली आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे कामधंदे पूर्णतः ठप्प झाले आहेत. ग्रामीण जनता सकाळ व संध्याकाळी केवळ ओट्यावर बसून गप्पा ठोकत आहेत. सध्या उन्हाळ्याचा मोसम आहे या काळात शेतीतील सर्व कामे आटोपली आहेत मजुरांच्या हाताला ही कोणतेच काम उरले नाही.

त्यामुळे मजूरही आता हात चोळत बसले आहेत. दरम्यान ७ एप्रिल पासून तेल्हारा शहर व तालुक्यातील गावागावात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मोफत धान्य वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गोरगरिबांना मध्ये समाधानाचे वारे वाहू लागले आहेत. परंतु शासनामार्फत ज्या गोरगरिबांना विविध योजनेअंतर्गत दरमहा मानधन मिळते ते मानधन अनेकांना अद्याप पर्यंत मिळाले नाही. आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर अनेकांनी आपल्या गावातील दुकानदारांकडून किराणा उधारीवर घेतला आहे. परंतु अद्यापही अनेकांच्या खात्यात सदर रक्कम पडली नसल्याचा आक्रोश सुरू आहे. आणि वृद्ध हे आपल्या बँकांमध्ये सध्या जाऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत या गरिबांना नगदी पैशांची चणचण भासू लागत आहे.

तहसील कार्यालयाने या गंभीर बाबीची नोंद घेऊन गोरगरिबांच्या खात्यात विनाविलंब निधी पाठविण्याची गरज आहे. विधवा, अपंग, वृद्ध हे सर्वजण सध्या पैसे केव्हा मिळणार या प्रतीक्षेत आहेत. सध्या ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. सध्या नगदी पैसे कोणी उदार द्यायला तयार नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसू लागली आहे. या वास्तविक परिस्थितीचा विचार करता सर्व शहरांमध्ये तसेच तालुक्यामध्ये गोरगरिबांना आवश्यक असलेले धान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे.

Tags: Akolanewsअकोला
Previous Post

ब्रेकिंग- अकोल्यात कोरोना बाधित रुग्णाची शासकीय रुग्णालयात आत्महत्या

Next Post

महाराष्ट्रातल्या ‘या’ ९ जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
corona-positive

महाराष्ट्रातल्या 'या' ९ जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही

cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

लॉकडाऊन किमान ३० एप्रिल पर्यंत कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.