• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपये विमा संरक्षण

Team by Team
May 4, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
gram-panchayat
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या बरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रातंर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणक परिचालक) यांनाही २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच आरोग्य कर्मचाNयांना ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. या शिवाय वंâत्राटी परिचालक व गावपातळीवरील कर्मचाNयांना वेतना व्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम अदा केली जाणार आहे.

कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन करणे, संशयीत रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे यासाठी गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक आदी सर्वजण अहोरात्र काम करीत आहेत. जीवाची जोखीम पत्करुन काम करणारे ग्रामीण पातळीवरील हे सर्व कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच आहेत. केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाNयांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीण भागात या कामात इतर ग्रामीण कर्मचारीही कार्यरत असल्याने राज्य शासनाने ३१ मार्च रोजी परिपत्रक काढून गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय अधिक व्यापक करुन यामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांचाही समावेश करण्यात आला असून आता त्यांनाही ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संगणक परिचालक हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचारी आहेत. पण तरीही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते गावागावांमध्ये जीवाची जोखीम पत्करुन काम करीत आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे ही अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

दरम्यान, ३१ मार्च रोजीच्या परिपत्रकान्वये गावांमध्ये कोरोना रोखण्यासाठी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या नियमीत वेतनाव्यतिरिक्त १ हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, त्यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच हे मानधन या कर्मचाNयांना देण्यात येत आहे.

Tags: अकोलाग्रामविकास
Previous Post

चोहट्टा बाजार जवळील एस्सार पेट्रोलपंप सील

Next Post

नगरसेवक गटनेता मनीष रामाभाऊ कराळे यांनी दिला गरजूंना मदतीचा हात

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
manish-karale-akot

नगरसेवक गटनेता मनीष रामाभाऊ कराळे यांनी दिला गरजूंना मदतीचा हात

positive-13

व्हिडीओ : आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह मा जिल्हाधिकारी यांची माहिती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.