अकोला: अकोला कोरोना हॉटस्पॉट ठरत असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत शुक्रवारी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. गुरुवारी रात्री उशीरा आणखी चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत. हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे, यामध्ये ३ वर्षांची मुलगी, ५ वर्षांच्या मुलासह त्यांची आई आणि एका ३० वर्षीय युवकाचा समावेश आहे. बैदपुरा हा परिसर आधिच सील करण्यात आल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 13 झाली आहे, रुग्णांची वाढती संख्या अकोलेकरांची चिंता वाढविणारी आहे.
व्हिडीओ : आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह मा जिल्हाधिकारी यांची माहिती