बेलखेड (प्रतिनिधी चंद्रकांत बेदरकार): अकोला जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गजन्य विषाणूचे नऊ रुग्ण आढळल्याने बेलखेड ग्रामपंचायतच्या वतीने मुंबई पुणे व बाहेर गावांमधून येणाऱ्या सर्व नागरिकांचे नोंद रजिस्टर मध्ये करून गावामध्ये त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवत आहेत व गावांमध्ये रोगराईचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बेलखेड ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी होत आहे.
ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.मेतकर साहेब, सरपंच सौ.ज्योतीताई गोमासे, ग्रा.प.सदस्य-मोहनभाऊ गोमासे, सत्यशील सावरकर, बाळकृष्ण निमकर्डे, रामेश्वर कुयटे व सर्व सदस्य ग्रा.प.कर्मचारी- गजानन सातव, निलेश अढाऊ, गोपाल वाकोडे व गावातील सामाजिक कार्यकर्ता विकी पाटील खुमकर यांनी सर्वकडे ब्लॉकडाऊन असल्याने लोकांना कोरोना विषाणू रोखण्याकरता वेळोवेळी मार्गदर्शन करून आपल्या गावाकरता सेवा देत आहेत.