जिल्ह्यात काल मंगळवारी पहिला रुग्ण आढळला असून, सलग दुसरा दिवशी चोवीस तास होत नाही तोच दुसरा रुग्ण आधळला असतानाच अकोलेकारांसाठी आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे