• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोकळ्या जागांवर भाजीपाला लागवड, परसबाग विकसित करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कोविड १९, गुन्हा
Reading Time: 1 min read
88 1
0
bacchu kadu
13
SHARES
637
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   लागू झालेल्या लॉक डाऊनची स्थिती पाहता भाजीपाला टंचाई भासू नये म्हणून विविध शासकीय, सार्वजनिक जागांवर उपलब्ध पाण्याचा वापर करुन भाजीपाला लागवड करावी तसेच  तसेच जिल्हाप्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजना लक्षात घेता घराबाहेर पडणे टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो आपल्या घरीच ( बागेत, छतावर, गॅलरीत इ.) परसबाग तयार करुन त्यात भाजीपाला पिकवावा,असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

 सद्यस्थितीत जिल्हा प्रशासन, कृषि विभाग, महसूल विभाग, परिवहन विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, नगरविकास विभाग , ग्रामविकास विभाग इ. विभागाच्या जिल्हा यंत्रणामार्फत गावपातळी नगर परिषद, नगर पंचायत, नगर पालिका महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये आत्मा योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत नागरीकांना फळे, भाजीपाला दूध, रेशन, इ. ऑनलाईन ऑर्डर घेऊन वाजवी दरात घरपोच सेवा देण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजीपाला, फळे ई. चे उत्पादन व पूरवठ्यामध्ये भविष्यात नागरिकांना समस्या निर्माण हाऊ नये म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषदा, महानगर पालिका, ओद्योगिक वसाहती मधील कारखाने कृषि विद्यालय व कृषि महाविद्यालय, शासकीय प्रक्षेत्रे , वसतीगृह इ. नी त्यांच्या आवारात उपलब्ध असलेले पाणी व जमिनीवर भाजीपाला, पालेभाज्या इ. किचन गार्डन तयार करावेत. स्वतःच्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला, त्यांच्या स्वत:च्या आवारात उत्पादन करावा, भाजीपाला, पालेभाज्या उत्पादन करण्यासाठी लागणारे बियाणे, सेंद्रिय खते ,सेंद्रिय किटकनाशके ई. जिल्हयातील सर्व परवानाधारक कृषि निविष्ठा विक्रेत्यांकडे साठा उपलब्ध आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये दर दिवशी कृषि निविष्ठा विक्री केंद्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत सूरू ठेवण्याचे आदेश दिलेले असून नागरिकांनी किचन गार्डन साठी आवश्यक लागणाऱ्या निविष्ठा खरेदी कराव्यात, निविष्ठा खरेदि करतांना कोविड -१९ बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे, जसे तोंडावर मास्क लावणे ,किमान तीन मिटर अंतर राखणे इ. गोष्टी पाळाव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी किचन गार्डन स्वत:च्या घराच्या गच्चीवर/परिसराच्या आवारात स्वउत्पादित भाजीपाला, पालेभाज्यांच्या किचन गार्डन संकल्पनेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अमोघ गावकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: bachhu kadu akolapalakmantriबच्चू कडू
Previous Post

प्रत्येक तालुक्यात उद्यापासून शिवभोजन थाळी केंद्र

Next Post

भाजीपाला, किराणा घरपोच सेवा देण्यासाठी ह्या संस्थांची निवड

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola home delivery bhajipala

भाजीपाला, किराणा घरपोच सेवा देण्यासाठी ह्या संस्थांची निवड

seth bansidhar high school telhara

तेल्हाऱ्यातील नामांकित शिक्षण संस्था शेठ बन्सीधर विद्यालयाने राज्य व केंद्र शासनाला दिली दोन लाखाची मदत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.