अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावास प्रतिबंध करणे, आवश्यक सहसाहित्य, उपकरणे, किट्स खरेदी, निर्जंतूकीकरण व अन्य तातडीच्या उपायोजनांसाठी विविध यंत्रणांना हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी महानगरपालिका २ कोटी, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय दोन कोटी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग दोन कोटी असे सहा कोटी रुपये तातडीचा निधी म्हणून उपलब्ध झाला आहे,असे सांगण्यात आले.