दानापूर (सुनिलकुमार धुरडे)– फिट इंडिया अंतर्गत’ गो, गर्ल, गो स्पर्धेत* 100 मीटर स्पर्धेत 15ते 18 या वयोगटात विभागीय स्तरावर सुवर्णपदक मिळवुन परत एकदा हनुमान प्रसाद साह जनता विघालयाचे,अकोला जिल्हा,तेल्हारा तालुक्याचे नाव उंचावले आहे . या स्पर्धेत स्थानिक हनुमानप्रसाद साह जनता विद्यालय दानापूरची खेळाडू विदयार्थीनी कु. शीतल दशरथ हागे हीने अमरावती येथे झालेल्या विभाग स्तरावर सुवर्ण पदक मिळवले असून शितल आता दि 8,3,2020 रोजी श्री, छत्रपती क्रीडा संकुल, म्हलुगे बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खेळण्यास पात्र ठरली आहे.शितल पुणे येथें होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत विभागाचे (5)जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विघालयाची ओळख म्हणजे जागतिक धावपटू अर्चना अढाव हीने ही सुवर्णपदक, कांस्य पदक, व विविध इव्हेंट मध्ये यश मिळत विघालयाचे नाव उंचावले आहे.
तिचे या यशा मुळे तिचे विद्यालयाचे व्यवस्थापक श्री. डॉ. अजेय विखे, मुख्याध्यापक श्रीराम डाबरे सर,परिवेशक श्री,विलास गावंडे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर वृद यांनी अभिनंदन केले आहे.
कु.शीतल ही आपल्या यशाचे श्रेय तिचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक नितीन मंगळे सर,गणेशभाऊ भारती व तीच्या आई वडिलांना देते.
कोड:अर्चना अढाव ने गेल्या 22 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार मिळून आम्हाला सुखद धक्का दिला होता. आज परत आमची एक विद्यार्थीनी शितल ने राज्यस्तरावर झेप घेऊन विघालयाचे नाव उज्जवल केले आहे.
डॉ, अजेय विखे, व्यवस्थापक हनुमान प्रसाद साह जनता विघालय दानापूर.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0