अकोला: आपण आपल्या लग्नात किंवा आनंदाच्या क्षणी डीजे लावून मिरवणूक काढतो. मात्र अकोल्यात एक अंतयात्रेला डीजे लावण्यात आला. ही अंतयात्रा महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या खेळाडूची होती.
अंतयात्रा चालू असताना डीजे वाजत होता. प्रणवच्या कुटूंबीयांनी हंबरडा फोडला होता. लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. लोक एकमेकांना धीर देत होते. नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं.
शुक्रवारी अकोला येथील शास्त्री स्टेडियम जवळ असलेल्या ‘क्रीडा प्रबोधनी’मध्ये प्रणवने गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रणवनं आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केलं नाही. माझी अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी, असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं.
एकीकडे प्रणवच्या आत्महत्येबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होतं. अशातच त्याच्या अंतयात्रेला डीजे लावण्यात आल्यानं सध्या या घटनेटी अकोल्यात चांगलीच चर्चा आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.