अकोला(प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी अकोला जिल्हाध्यक्ष यांच्यावर दहा वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कबुतरी मैदानावर तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी देशी कट्याने गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले होते अकोल्यात त्यांचा अखेर उपचारासादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत वृत्त असे काल जवळपास दहा वाजेच्या दरम्यान अकोटातील कबुतरी मैदानाजवळील दूध डेअरी जवळी अज्ञात दोन जणांनी हिरो होंडा पेंशन प्रो दुचाकी वरून येऊन प्रहारचे तुषार पुंडकर यांच्यावर देशी कट्ट्याने गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. सदर घटना ही नेहमी गजबजलेल्या स्थळावर घडली उपस्थित नागरिकांनी पुंडकर यांना अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला हलवण्यात आले अकोल्यात त्यांचा वर आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री राज्यमंत्री बच्चू कडूसह बरेच मोठे नेते तिथे दाखल झाले होते.मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बाब डॉक्टराणी स्पस्ट केली.अकोला सामान्य रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात येणार.अकोटात रात्री पासून तणावाचे वातावरण असून मोठा फौज फाटा दाखल झाला आहे.आज अकोटात तुषार पुंडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.तर पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू काल मधरात्रीपासून अकोल्यात दाखल झाले आहेत.