अकोट(देवानंद खिरकर) – गेल्या 7 वर्षापासुन ज्या 8 गावांचे पुनर्वसन झाले अशा या गावातील नागरीकांना शासनातर्फे पुनर्वसनाची जी मदत मीळते ती बरोबर मीळत नाही. अशातच आमच्या केलपाणी गावातील व्यक्ती नामे हिरालाल जामूनकर दि. 13/02/2020 रोज बुधवार आजारपणामुळे मय्यत झाले आहेत. त्यांची वनविभागाकडे एम. आय. डी. आर ची रक्कम 1 लाख रुपये जमा असुन तो वारंवार आजारपणाच्या उपचाराकरीता पैसे मागणी करीता वनविभागाच्या अधिकार्या कडे गेला असता त्याला तेथून हुसकावुन लावण्यात आले. वेळेवर उपचारासाठी पैसे न मीळाल्यामुळे हिरालाल जामूनकर यांचा दुदैवी मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूला कारण वनविभागाचे अधिकारी आहेत. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. व पुढे भविष्यात असा अनुचित प्रकार कोणासोबत घडता कामा नये. अन्यथा समस्त आदिवासी समाजातर्फे तिव्र अंदोलन छेडण्यात येईल. अशा ईशार आदिवासी समाजाने दिला आहे. सदर निवेदन आज 17/02/2020 ला देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी सुभाष सुरत्ने, कमल भास्कर, व बहुसंख आदिवासी बांधव उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8