बोर्डी(देवानंद खिरकर) – प्रकट दिनानिमित्त दर्शनाकरिता पायी वारीत शेगावला जाणार्या दोन भक्तांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचया कुटुंबीयांंना तातडीने मदतीचा हात म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी अकोट तालुक्यातील पळसोद या गावी येऊन मृतकांच्या कुटुंबीयांंना 7 लाख रुपयेची मदत 17 फेब्रुवारी रोजी दिली.
अकोट तालुक्यातील पळसोद येथिल वारकरी शाम गोपाल तिव्हाणे व विशाल संजय पाटेक यांचा शेगाव मार्गावर लोहारा नजिक टीप्परने धडक दिल्याने 14 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.त्या नंतर मृतकाचे नानातेवाईक व पळसोद ग्रामसस्थांनि ठीय्या अंदोलन सुध्दा केले.हलाखिची परिस्थिती असलेल्या कुटुंबीयांंना आर्थीक मदत मिळावी या करिता शिवसेनेच्या वतीने आस्वासन दिले होते.या आस्वासनाची पूर्तता म्हणून आमदार नितीन देशमुख यांनी मृतक भक्तांच्या घरी जाऊन कुटुंबीयांंना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी 50 हजार रुपये रोख तर कंत्राटदारां कडुन प्रत्येकी 3 लाख रुपयेचा धनादेश अशी एकुण 7 लाखाची मदत सुपूर्द केली.
यावेळी आमदार नितीन देशमुख व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी मृतक कुटुंबियांच्या पाठिशी शिवसेना सदैव राहील तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन त्यांना मदत मिळवुन देण्याचे सांगितले. यावेळी आमदार नितीन देशमुख,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख शाम गावंडे, गोपाल दातकर, राहुल कराळे, प्रशांत अढाऊ, गोपाल म्हैसने, राजू राठी, तसेच पळसोद सरपंच, उपसरपंच व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8