अटकळी (दीपक दारोकार)- अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेली ग्राम पंचायत अटकळी येथे गेल्या काही वर्षात आगोदर वारा उधनाने जुन्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीवरील अंदाजे 36 टिन पत्रे उडून पडली इमारत पडझड झाली ग्राम पंचायतने दि.२८ जुन २०१८ रोजी हर्षी करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता त्यामध्ये सरपंचांनी २५ टिन पत्रे ग्रामपंचायत कडे असल्याचे सुचित केले. तसेच २ पाणी पुरवठा मशीन,७ लोखंडी पाईप हर्रासी करण्याबाबत ठराव घेण्यात आला परंतु हर्रासी काही होईना परंतु या साहित्याचा गैरवापर सुरु असल्याबाबत व हर्रासी करण्याबाबत तक्रार अटकळी तिल काही ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्यानंतर सरपंच,सचिव यांना चेव आला व ग्रामपंचायत ने ठरवा घेतल्या नंतर थेट एका वर्षानंतर हर्रासी मूल्य ठरवून देण्या बाबत दि.१४ जुन २०१९ रोजी अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा सरपंच,सचिव ग्राम पंचायत अटकळी यांनी दिला व या अर्जा मध्ये २ दरवाजे व २ खिडक्या यांचासुद्धा समावेश होता यामध्ये असे दिसतेे की घोळच घोळच कोणी केला घोळ.
आम्ही ग्राम पंचायत सरपंच,सचिव यांना यासंदर्भात विचारलं असता त्यांचे म्हणणे आहे की आम्ही गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांना मूल्यांकना बाबत अर्ज सादर केला आहे परंतु आम्हाला वस्तूचेेेेे मूल्यांकन ठरवून दिले गेले नाही त्यामुळे आम्ही हर्रासी करू शकत नाही
मात्र ग्रामपंचायत मालकीच्या साहित्याचा गैरवापर सुरूच आहे असे काही ग्रामपंचायत सदस्यांचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे मात्र खरंच जर या साहित्याचा गैरवापर होत असेल तर तो थांबणार कधी ? असा प्रश्न उपस्थित झाला व दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की गटविकास अधिकारी तेल्हारा यांना हर्रासी मूल्य ठरून देण्याबाबत अर्ज देऊन १ वर्ष होत आले परंतु हर्रासी मूल्य ठरवून का ? दिला जात नाही गटविकास अधिकारी, सरपंच, सचिव, शाखा अभियंता, यांचे काही लागे बांधे आहेत का अशा विविध चर्चा काही ग्रामस्थ करीत आहेत व तसेच हे ग्रामस्थांच्या चर्चेवरून असे आढळून येते की हे अधिकारी सर्वस्वी जबाबदार असून शासनाचे होणारे नुकसान व गावाच्या विकासात अडथळा करत असल्याचे मतल्या जात आहे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांची योग्य ती सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध योग्य मार्गाने कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत
प्रतिक्रिया
गट विकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा – १४ फेब्रुवारी पर्यंत सदर शाखा अभियंता पंचायत समिती तेल्हारा हे पाहाणी करुन साहित्याचे व्हॅल्युएशन काढून देतील.