अडगांव बु (दिपक रेळे)- जि. प. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, हिवरखेड ता तेल्हारा जि अकोला येथे दि १० फेब्रुवारी २०२० ला इंटर्नशिप पूर्ण कारणारया विद्यार्थ्यांचा कौतूक सोहळा मन्यवारांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन उत्साहत संपन्न झाला.
मान्यवारांच्या हस्ते द्विपप्रज्वलन व सरस्वती देवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाला उदघाटक म्हणून शाळा समिती अध्यक्ष श्री उमेशभाऊ ताडे हे लाभले तर कार्यक्रमाचें अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री. संजय अंधाळे सर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री रविंद्र जाधव सर, बि – मार्ट चे संचालक श्री राजेश भंडारी, ओमसाई फॅशन चे संचालक श्री आशिष नाथे, हिवरखेड आणि रेवती हिरो मोटरचे संचालक श्री विनोद कडू, प्रा मिसाळ सर प्रा इंगळे सर प्रा श्री साखरे सर, एम्पावर प्रगती प्रा. लि. कंपनी समन्वयक श्री शोभितकुमार तीरपुडे, बि – अबल कंपनी समन्वयक, आय. एल. & एफ. एस कंपनी समन्वयक, आणि विद्यांता कंपनी समन्वयक हे उपस्थित होते.
यावेळी लाही संस्था, पुणे व व्यवसाय शिक्षण जिल्हा समन्वयक श्री विक्रम शिंदे यांनी कार्यक्रम प्रस्तावनेत सांगितले कि सन २०१५ पासून जिल्ह्यातील ११ शाळा मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत विविध कौशल्य व्यवसाय शिक्षण विषय सुरू आहेत पैकी यंदा ४ शाळा ह्या इंटर्नशिप करिता पात्र होत्या यात जि. प. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, हिवरखेड ता तेल्हारा, जि. प. विद्यालय व महाविद्यालय, अडगाव बुद्रुक. ता. तेल्हारा , जे. बि. न. प. विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, मूर्तिजापूर आणि शासकिय आश्रम विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, कोथळी ता बार्शीटाकळी या शाळांच्या इ ११वि व इ १२ वीच्या एकूण ११० मल्टीस्कील, हेल्थकेअर आणि रीटेल व्यवसाय विषयाच्या विद्यार्थ्यांनी ९ एम्प्लॉयर कडे इंटर्नशिप केल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद महाविद्यालय अडगाव बुद्रुक येथील मागील वर्षी वर्ग दाहावी मधून महाराष्ट्रातून प्रथम आलेली कुमारी नेहल चतुरसिंह बैस व कुमारी प्रियंका दशरथ सोळंके हिने इंटर्नशिप बद्दलचा आपला अनुभव त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला इंटर्नशिप मुळे विद्यार्थ्यांना प्रत्येकक्ष कामाच्या अनुभवातून आत्मविश्वास वाढतो तसेच १२ वि नंतर पुढील शिक्षणाच्या विविध संधी नोकरी – व्यवसायतील संधी उपलब्ध होण्यास मदत होते.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. संजय अंधाळे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित विद्यार्थी यांचे कौतुक करताना म्हणाले कि व्यवसाय शिक्षण हिं काळाची गरज आहे यातून कुशल विद्यार्थी घडतिल ज्यामुळे बेरोज़गारीसारख्या प्रश्नावर मात करने सोपे होईल पुढे त्यांनी व्यवसाय शिक्षनाचे दैनदिन जिवनातील फायदे सांगितले सोबतच अश्याप्रकारे यशस्वि इंटर्नशिपसाठी ज्या व्यवसाय प्रशिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले त्यांचेही यावेळी त्यांनी कौतूक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिटेल व्यवसाय शिक्षक श्री अभिजीत लोखंडे, श्रीमती शारदा मॅडम, श्रीमती अर्चना गावंडे, श्रीमती पूजा खंडारे श्रीमती किरण भेंडेकर श्री प्रितेश गावंडे आणि गणेश गावंडे यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंगेश नाकट सर यांनी केले तर आभार श्री संदेश वाईलकर सर यांनी मानले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8