हिवरखेड(धीरज बजाज)- मध्यप्रदेशातील देडतलाई आणि सातपुडा पर्वतातील धारणी येथून अवैधरित्या तस्करी करीत हिवरखेड नजीकच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या प्रवेश करून गोवंश तस्करीचा प्रकार 27 तारखेच्या पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान गस्तीवर असलेल्या वान रेंज चे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व कर्मचारी वर्ग, आणि विभागीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गोवंश जप्तीची धाडसी कारवाई केली यामध्ये 20 गोवंश जप्त करण्यात आले असून अंधाराचा आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन सर्व आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. वनविभागामार्फत यांच्या धरपकडचे प्रयत्न सुरू आहेत. सदर धाडसी कारवाई अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी साहेब, उपवन संरक्षक श्रीमती टि. बेऊला, सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली वान रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली.
वेगळा बॉक्स करणे वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची घटना घटना उजेडात
मागील काही महिन्यात वन विभागाने मेळघाटमधून होत असलेल्या गोवंश तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केल्याने वन तस्करांचे धाबे दणाणले. मागील आठवड्यात वनविभागाने धाडसी कारवाई करीत तीस-चाळीस गोवंश तस्करी करताना कारवाई करण्यास गेले असता जवळच्या तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना उजेडात आली आहे सदर हल्ल्यांमध्ये अनेक वन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि जीवे मारण्याचे धमक्या देण्यात आल्या. सदर घटनेत वन कर्मचाऱ्यांनी पवनसुत तस्करांचा धैर्याने सामना करीत 10 गोवंश जप्त केले. परंतु उरलेले गोवंश घेऊन आरोपी त्याही वेळेस फरार होण्यात यशस्वी झाले होते सदर प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर दहा ते बारा आरोपींचा शोध घेणे सुरू आहे सदर घटनास्थळ चिखलदरा पोलीस ठाणे अंतर्गत येत असून वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8