अकोला(जिमाका)- अकोला शहरात ठिकठिकाणी सुरू असलेले रस्त्यांची कामे व अन्य कारणांमुळे वाढलेली धुळ आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करून शहर धुळमुक्त करण्यासाठी संबंधीत विभागांची उपाययोजना समिती गठीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधीत विभागांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे , राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिनकर नागे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना उपअभियंता राजेंद्र धिनमिने, मनपा उपायुक्त वैभव आवारे, मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, जान्दु कन्स्ट्रक्शनचे एम.एस. चंदनबटने आदी उपस्थित होते. यासंदर्भात पालकमंत्री ना. कडू यांनी दि.15 रोजी आढावा बैठकीत निर्देश दिले होते.
यावेळी सुचना देण्यात आल्या की, जेथे रस्ते वा अन्य विकासकामे सुरू आहेत. तेथे संबंधित ठेकेदाराने धुळ नियंत्रणाबाबत उपाययोजना राबवण्यात. या संदर्भात प्रत्यक्ष साईट निहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. जेथे रस्त्याचे मुरूम पसरवण्याचे काम सुरू असेल तेथे पाण्याचा शिडकावा करण्याबाबत तसेच वळण रस्त्यांचे डांबरीकरण करावे म्हणजे धुळीचा उद्भव कमी होईल. याबाबत तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रारूप या प्रमाणे-
अध्यक्ष-सहाय्यक आयुक्त मनपा अकोला, उपाध्यक्ष- पोलीस उप निरीक्षक अकोला, सदस्य सचिव- उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला, सदस्य- निवासी नायब तहसिलदार, अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता (बांधकाम) मनपा अकोला, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) मनपा अकोला, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला
या समितीने धुळ प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्या व धुळ नियंत्रण करावे, असे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8