भांबेरी(योगेश नायकवाडे) : तेल्हारा तालुक्यातील भांबेरी ८ गटातून अनु जाती प्रवर्गातून बहुमताने निवडुन आलेल्या सौ प्रतिभाताई बापुराव भोजने, यांचे प्रवास हा थक्ककरणारा आहे कुटुंबाची परिस्थिती पाहता जेमतेम फुले शाहू आंबेडकर विचार काय स्वीकार करून त्यांनी एक महिला कार्यकर्ता म्हणून काम केले त्याचे पती हे भांबेरी पोस्ट मास्टर ह्या सेवेत तर त्याना एक मुलगी व तीन मुले यांना उच्च शिक्षित केले इंजिनियर केले या कोटुंबिक धावपळीच्या काळात सुद्धा त्यांनी बाळासाहेबांच्या अकोला जिल्ह्यातील गाव खेड्यात आपली कार्य सुरू ठेवले समाजाला काही तरी देणे लागत त्यामुळे सतत सामाजिक कार्यात सुद्धा स्वतः ला वाहून घेतले आहे.
यात त्यांना नेहमी ऊर्जा व मद्दत ही पती बापुराव भोजने यांच्या कडून मिळते तर यात मुले, प्रवीण भोजने, अमोल भोजने, अक्षय भोजने यांचा सुद्धा सिंहाचा वाटा असतो त्यामुळेच तर आज एक सर्व सामान्य कुटुंबातील एक पक्षाच्या भारिप बहुजन महासंघाचे महिला कार्यकर्त्या त्या आज वंचित बहुजन आघाडी च्या विद्यमान महिला आघाडी तालुका अध्यक्षा असा त्यांचा हा प्रवास असून त्यांच्या या कार्याचे फलित वंचिताचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी झालेल्या २०१९ च्या जिल्हा परिषद निवडणुकी उमेदवारी देऊन मतदारानी त्याना त्यांच्या कामाचे फळ दिले असून येत्या काळात नक्कीच त्या तेल्हारा तालुक्यातील विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून विकास कामे मार्गी लावतील व जिल्ह्यातील आढावा घेऊन जिप सक्षम करतील हे मात्र नक्की अनुसूचित जाती करीता राखीव असलेल्या तेल्हारा तालुक्यातील ” भांबेरी ८ सर्कल जिल्हा परिषद गटातून निवडून वंचीत बहुजन आघाडी च्या नेत्या प्रा अंजलीताई आंबेडकर प्रदेशाध्यक्ष अशोकराव सोनोने महासचिव अमित भुईगळ वंचीत चे अकोला जिल्हा नेते ऍड संतोष राहाटे यांच्या अत्यंत निकटवर्तीय त्यांचा जेष्टतवा मुळे व सर्व जाती समुहाशी सलोखा आणि संपर्क ठेवत पक्षात कामाची सुरुवात *1990 मध्ये भारिप बहूजन महासंघा अकोला जिल्हा मधुन एक सक्रिय कार्यकता म्हणुन सुरूवात केली 1990 पासुन तर आता पर्यँत चळवळी शी एक निस्ट राहुन पक्षाची गरिमा जोपासली.
गेली २९ वर्षे पक्षात विविध प्रमुख पदावर काम करीत आहे. पक्षातील सभा संमेलने आंदोलने ह्या मध्ये सक्रिय सहभाग आहे स्वतंत्र विदर्भ आंदोलन, कापुस आंदोलन,रास्ता रोको, रेल रोको, मोर्चे ह्या मध्ये सहभाग घेतलेला आहे. पक्षाच्या वतीने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, महापालिका, नगर पालिका ह्या निवडणुका मध्ये प्रचार आणि नियोजनात सक्रिय सहभाग राहिला आहे.
२०१९ पूर्वी कोणतीही निवडणूक लढविली नाही. पक्ष विरोधात बंडखोरी केली नाही किंवा पक्षांतर केलेले नाही. अकोला जिल्ह्यातील गाव, तालुका जिल्हा पातळीवरील सर्व प्रत्येक गावात परिचय आहे. संघटनात्मक बांधणी व निवडणुका मधील २९ वर्षांचा पक्षातील अनुभव व पक्षा साठी भरीव कामा मुळे एकमताने निवड त्यांच्या निवडीचे श्रेय ते पक्ष अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर सह अकोला तेल्हारा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मतदार याना देतात.