पातूर(सुनील गाडगे)- यूजीसी दिल्ली ने घेतलेल्या नेट परीक्षेचा निकाल नुकताच मंगळवारी जाहीर झाला आहे. ही परीक्षा महाविद्यालयिन शिक्षक साठी (सिनियर लेक्चरर ) पात्रता परीक्षा असल्याने संपूर्ण देशातून दहा लाखाच्या वर विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत पातूर येथील वैभव बबनराव डोंगरे इतिहास विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे या अगोदर त्याने राज्यशास्त्र व इतिहास या दोन्ही विषयाची सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
विशेष बाब पातूर चा हा वैभव इतिहास विषयाचा अमरावती विद्यापीठ चा सुवर्ण पदक चा मानकरी ठरला आहे. पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालय बाभूळगाव चे माजी प्राचार्य बबनराव डोंगरे व नगर परिषद प्राथमिक शाळा पातूर च्या शिक्षिका सौ. आशामती डोंगरे यांचा मुलगा आहे.
वैभव याने यशाचे श्रेय डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन.जायले, डॉ. प्रा. ममता ताई इंगोले, तसेच प्राध्यापक वृद, आई-वडील यांना दिले आहे. पातूर येथे एका छोटेखानी कार्यक्रमात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. अनिता रणबावरे, प्रा. भास्कर काळे, प्रा. लक्ष्मण राव नितनवरे, प्रा. रवीद्र दाभाडे, विजय हिरळकर, प्रमोद घोडे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.