अकोला: – कान्हेरी जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर ऊमेदवाराचे आडनांव नसल्याने सदर एबी फॉर्म वैध नसल्याचा आक्षेप भारिप बहूजन महासंघाचे कान्हेरी सरप जिल्हा परिषद ऊमेदवार राजेंद्र पातोडे यांनी दाखल केला आहे.
कान्हेरी जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर संजय आत्माराम एवढाच ऊल्लेख आहे, ह्या नावाचे अनेक लोक असू शकतात. त्यामुळे हा एबी फॉर्म आडनाव नसल्याने कुणाचा आहे, हे सिध्द होत नसल्याचा आक्षेप राजेंद्र पातोडे यांनी घेतला. एबी फॉर्मवर पक्षाचे प्रदेश पदाधिकारी यांची स्वाक्षरी असते. त्या मुळे एबी फॉर्मवर बदल करण्याचा अधिकार किंवा ऊमेदवार यांना नसतो. शिवाय ऊमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काल दुपारी ३ वाजता नंतर कुठलाही बदल करण्याचा अधिकार देखील नसतो. असा आक्षेप असल्याने निवडणुक निर्णय अधिकारी अनिल खंडागळे यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर दुपारी पर्यत निर्णय राखीव ठेवला आहे.
आडनाव नसल्याने हा एबी फॉर्म वैद्य ठरविला तर जिल्हा अधिकारी व निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्याचा व प्रसंगी न्यायालयात जाण्याचा ईशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.