हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी झरी गेट येथून हिवरखेड कडे येत असताना दि 23 डिसेंबर सोमवार रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान हिवरखेड पोलिसांनी अत्यंत निर्दयतेने गोवंश यांची वाहतुक करताना दोन बोलेरो पिकप सहित सात गोवंश असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला वृत्त लिस्टवर हिवरखेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पिकप मध्ये एकूण सात गोवंश यांना निर्दयतेने कोंबून कत्तलीचा हेतूने तस्करी करण्यात येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून सदर कारवाई करण्यात आली सात पैकी गोविंदाचा मृत्यू झालेला आढळून आला तर एक गोवंश सिंग तुटून गंभीर जखमी झालेला असून त्याला प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास येत होते पीक अप क्रमांक एमएच X 2329 आणि एम एच 30 ए बी 2799 ह्या दोन पिकअप द्वारे ही अवैध तस्करी केली जात असल्याने ती वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.
याप्रकरणी दोन आरोपी शेख इम्रान शेख अयुब, रफिक खा मुर्तुजा खा तुम यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होतीहि कारवाही हिवरखेडचे ठाणेदार आशिष लवंगडे, पि एस आय विठ्ठल वाणी, गोपाल दातीर महादेव शेंडे, महादेव नेव्हारे, विनोद गोलाईत, इत्यादींनी केली
प्रतिक्रिया
वर्षानुवर्षे मध्यप्रदेशातून हिवरखेड मार्गे अवैध गोवंश तस्करी राजरोसपणे सुरू असून दिखाव्यासाठी एखादीच कारवाई केल्या जाते.
हजारो मुक्या निष्पाप जनावरांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोवंश तस्करीवर पोलीस आणि वनविभागाने वचक ठेवून हा गोवंश तस्करीचा नियमित सुरु असलेला प्रकार तात्काळ पूर्णपणे बंद करावा.
पंकज टावरी, जीवरक्षिणी प्रतिष्ठा