खामगाव- बुलढाणा जिल्हामधील खामगाव तालुक्यातील घाटपुरी नाका परिसरा मध्यरात्री दोन युवकांच्या झालेल्या हत्येमुळे खामगाव इथे मोठी खळबळ उडाली आहे. मध्य रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने दोन युवकांची हत्या करण्यात आली. हे दोन्ही युवक भाजपचे सक्रीय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. विशाल देशमुख (वय 30) घाटपुरी नाका, सचिन पवार (वय 33) अशी हत्या झालेल्या दोन युवकांची नावं आहेत.
खामगाव इथे विशाल देशमुख यांचा शुक्रवारी रात्री वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करून येत असताना घाटपुरी नाका इथे त्याच्यावर तीन जणांनी धारधार शस्रानं वार केल्या आणि त्यानंतर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. वाढदिवसादिवशी हा धक्कादायक प्रकार घडल्यानं देशमुख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन संशयितांवर पोलिसांची नजर आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी अनोखी शक्कल अवैध व्यवसायातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी 302, 34 कलमा नुसार गुन्हा दाखल केला असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. गजानन भोंगळ, रवींद्र भोंगळ, अरविंद भोंगळ अशी संशयितांची नाव असून सध्या पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी दोन संशयित आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे.
हे दोन्ही युवक भाजपचे सक्रीय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांवरही सुरुवातील चाकूने वार करण्यात आले आणि नंतर दगडानं ठेचून मारण्यात आलं. हत्या झालेचं लक्षाच येताच तिघांनीही तिथून पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री व्यवसायातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्यानं खामगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी देशमुख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.