अकोला (प्रति)- अकोला जिल्ह्यातील व शहरातील खासगी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जिवनदायी योजना सुरू करावी अशी मागणी उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना पाठवीलेल्या पत्राद्वारे केली आहे.
अकोला जिल्ह्यातील काही खासगी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जिवनदायी योजना सुरू होती पंरतु ती योजना बंद करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील गरीब रुग्णांकरीता महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले जिवनदायी योजना सुरु केली होती जेणेकरुन गरीब रुग्णाकरीता या योजनेचा फायदा होईल पन अकोल्यात असे न होता या योजनेचा बट्टयाबोळ झाला आहे. या योजनेचा अकोल्यातील गरीब रुग्णानां लाभ मिळावा म्हणुन अकोल्यातील,
१)आयकॉन हॉस्पिटल
२)ओझोन हॉस्पिटल
३)सहारा हॉस्पिटल
४)ऑरबीट हॉस्पिटल
५)स्माईल हॉस्पिटल
६)राऊत हॉस्पिटल
७)के एस पाटील ,हॉस्पिटल
८)केळकर हॉस्पिटल
९)देवकी हॉस्पिटल
१०)रावनकर हॉस्पिटल
११)शुक्ला हॉस्पिटल
या नावाजलेल्या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जिवनदायी योजना सुरू करावी जेणेकरुन गोरगरीब रुग्णानां या योजनेचा लाभ मिळेल जिवनदायी योजना सुरू न करणाऱ्या हॉस्पिटल वर बंदी घालावी अन्यथा रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्राद्वारे करण्यात आली. यावेळी उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला, दीलीप दंदी साहेब,महेंद्र खंडारे,सतिश तेलगोटे,मयुर सरदार, रोहित सदांशिव,सुबोध गवई, आकाश गवई, गुणवंत इंगळे, योगेश हीवराळे,महीला आघाडीच्या मिनाक्षी ताई तायडे, शोभाताई खडसे, उषाताई पखाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.