अकोला (प्रतिनिधी)- अकोला शहरात एकाच वेळी सर्व प्रमुख रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याने व वाहतुकी साठी अरुंद रोड राहिल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्या साठी वाहतूक पोलिसांना दररोज खूप धावपळ करावी लागते, परंतु रोड च्या क्षमतेच्या किती तरी जास्त वाहने रोड वर धावत असल्याने व त्या मध्ये ऑटोची संख्या लक्षणीय असल्याने वाहतूक पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरीही वाहतूक अधून मधून खोळंबते व दिवसभर मेहनत घेऊनही वाहतूक पोलिसांना टीका सहन करावी लागते.
विशेष करून अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन ह्या प्रमुख मार्गावर बस स्टँड, रेल्वे स्टेशन, न्यायालय तसेच प्रमुख कार्यालये असल्याने वाहतुकीचे प्रचंड वर्दळ दिवसभर राहते व ह्याच मार्गावर हजारो ऑटो धावत असल्याने फक्त वाहतूक नियमन व दंडात्मक कार्यवाही करून हा प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरातील अशोक वाटिका ते टॉवर चौक रोड वरील ऑटो चालकांची मीटिंग घेऊन त्यांना वाहतूक सुरळीत ठेवण्या साठी आवश्यक त्या सूचना दिल्या.