अकोला (दीपक गवई)- राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर अकोल्यात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केलाय..
शपथविधीनंतर अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यलयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटप करून जल्लोष केलाय.. यावेळी भाजपचे महापौर अर्चना मसने, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगरध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या उपस्थित हा जल्लोष करण्यात आला.