वाडेगांव(डॉ चांद शेख)- केंद्रा कडून नुकसान भरपायी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या साठी संपुर्ण महाराष्ट्रात पहणी सुरू असुन आज रोजी वाडेगांव परिसरातील भरतपूर, नकाशी, वाडेगांव, कासारखेड, या ठिकाणी केंद्रीय पतकाने केली शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकाची पहाणी केली तसेच वाडेगांव कृषी उत्पन्न बाजार समीती मध्ये आलेल्या मालाची पहाणी केली असता त्यांना बाजारा मध्ये उडीत, मुग, सोयाबीन ९५ % टक्के खराब झालेले आहे.
तसेच ज्वारी १०० टक्के खराब झालेली दिसत आहे असे आर पी सिंह संचालक केंद्रीय कृषी मंत्रालय यांनी सांगीतले ,तसेच भाववारी खाजगी व्यापाऱ्या कडून सोयाबीन ची खरेदी ८०० रुपाया पासून तर २२०० रूपाया पर्यंत खरेदी केल्या जाते तसेच ज्वारी ७०० ते १३०० रुपया पर्यंत खरेदी केली जाते असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास नावकार यांनी सांगितले यावेळी आर पी सिंह संचालक केंद्रीय कृषी मंत्रालय भारत सरकार, पियुष सिंह विभागीय आयुक्त, सुभाष नागरे विभागीय सह संचालक , लोणकर साहेब अतिरीक्त जिल्हा अधिकारी, जि. अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, गटविकास अधिकारी समाधान वाघ, उपविभागीय अधिकारी रमेश पवार, तहसीलदार पुरूषोत्तम भुषारी , ता कृषी अधिकारी नंदकुमार माने , कृ .उ. बाजार समीतीचे के .एस. नावकार, रामेश्वर म्हैसने, जिल्हा निबंधक लाड, सहकार अधीकारी जे . बी . कुळकर्णी ,गणेश कंडारकर, प्रमोद भाऊ डोंगरे ग्रा.प सदस्य, प्रकाश कंडारकर, शामलाल लोध, दादाराव मानकर, अजय भुस्कुटे , नजरु ठेकेदार , सुनिल महाजन, गोपाल कंडारकर, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी,कृषी सहायक , तलाठी, कोतवाल, शेतकरी , सर्व पत्रकार, इत्यादी उपस्थीत होते.