मुंबई, 23 नोव्हेंबर: मुंबईतील राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली.
सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी महाविकासआघाडीकडून सातत्यानं बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळं ठरत असताना मात्र अचानक राजकीय भूकंप आला आणि थेट राजभवनात मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्यानं अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळं समीकरण समोर आलं आहे.
महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.