• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दोन दिवसात दुसरी कारवाई,लाचेची मागणी अन अकोल्यातील पीएसआय एसीबी च्या जाळ्या

City Reporter by City Reporter
May 28, 2020
in Featured, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
acb
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी ) : देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास पकडल्यानंतर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून अटक न करता त्यास सोडून देण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा त्यावेळी मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक दीपक मारोती सोळंके यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. सलग दोन दिवसांत एकाच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि एक कर्मचारी लाचखोरीत अडकल्याने मोठ्या प्रमाणात लाचखोरी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

मूर्तिजापूर येथील सिरसो परिसरातील रहिवासी एका ४३ वर्षीय तक्रारदारावर दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक न करण्यासाठी त्याचवेळी सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासोबतच पकडलेली नवीन दुचाकी जप्त न करता जुनी दुचाकी जप्तीमध्ये दाखविली. या मोबदल्यात एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले; परंतु तक्रारदारावर काही संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही; मात्र या प्रकरणाची पडताळणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० आॅगस्ट रोजी केली. या पडताळणीत आरोपी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके हा दोषी आढळल्याने लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी केली.
दोन दिवसांत दोन ट्रॅप
लाचखोर पोलीस अधिकारी व कर्मचाºयावर दोन दिवसांत दोन ट्रॅप झाल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोरी प्रचंड वाढल्याचे वास्तव आहे. पहिल्याच दिवशी एका कर्मचाºयास लाच घेताना अटक केल्यानंतर दुसºयाच दिवशी त्याच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करताना पडताळणीत दोषी आढळतो. यावरून लाचखोर पोलिसांनी गेंड्याची कातडी पांघरल्याचे दिसून येत आहे.जिल्हा पोलीस विभागात हप्ते खोरीत जम बसवत असून लागोपाठ दोन दिवसात पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना लाच मागितल्या वरून कारवाई झाल्याने पोलीस अधीक्षक गावकर यांनी याबाबत कठोर पावले उचलावी जेणे करून हप्ते खोरीच्या नशेत असलेल्या जिल्ह्यातील पोलीस विभागाला वठणीवर आणता येईल.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Previous Post

आदिवासी नोकर भरती विरोधात अकोला जिल्हा समाजकार्य कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next Post

पातूर पोलिस ठाण्यात  दुर्गा उत्सवासंदर्भात आढावा बैठक संपन्न

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
दुर्गा उत्सव

पातूर पोलिस ठाण्यात  दुर्गा उत्सवासंदर्भात आढावा बैठक संपन्न

शहर वाहतूक शाखा

शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बुजवला अपघातास निमंत्रण देणारा मुख्य रस्त्यावरील खड्डा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.