अकोला (जिमाका)- अकोला येथे राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन मंगळवार दि.२४ ते शुक्रवार दि.२७ या कालावधीत होत आहेत. या स्पर्धांचे यजमानपद यंदा अकोला जिल्ह्याकडे असूनउत्तम आयोजनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, बॅडमिंटन ॲण्ड शटलर्स असोसिएशनचे तुषार देशमुख, निषाद डीवटे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, राज्यस्तर शालेय बॅडमिंटन (14,17,19 वर्षाआतील मुले/मुली) क्रीडा स्पर्धा या स्पर्धेचे यजमानपद अकोला जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांचे विद्यमाने दि. 24 ते 27 या कालावधीत स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे आयोजित करण्यात आल्या आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषदयांच्या अध्यक्षतेखाली अकोला डिस्ट्रीक बॅडमिंटनॲण्ड शटलर्स असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सर्वसबंधित विभाग प्रमुखांचे सभा घेऊन नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आयोजन समिती, निवास व्यवस्था समिती, तांत्रीक समिती, भोजन व्यवस्था समिती, प्रसिध्दी समिती, क्रीडांगण समिती, वैद्यकीय समिती, स्वागत समिती, स्पर्धा व्यवस्थापन इ. समित्यांचे गठण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना राज्यस्तर स्पर्धा कार्यक्रम कळविण्यात आलेला आहे. राज्यस्पर्धेमध्ये एकुण 8 विभागातून 48 संघ व 146 निवड चाचणी खेळाडु सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विभागनिहाय खेळाडूंची संख्या या प्रमाणे- १४, १७ , १९ वर्षाखालील मुला- मुलींचे प्रत्येकी पाच खेळाडू व दोन व्यवस्थापक असेएकूण ३६ जण तर निवड चाचणी बाबत मुले व मुलींचे संघ मिळून १८ असे प्रत्येक विभागातून सहभागी होतील. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पंच अधिकारी व खेळाडूंची एकुण संख्या ४७३ इतकी होते.
या स्पर्धा स्व वसंत देसाई स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, अकोला येथे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांचे तांत्रिक मार्गदर्शना खाली व अकोला डिस्ट्रीक बॅडमिंटन ऍ़न्ड शटलर्स असोसिएशन अकोला तांत्रिक सहकार्याने होतील.
या स्पर्धेसाठी बॅडमिंटन हॉल मध्ये सहा कोर्ट तयार करण्यात आले आहेत. दि.24 रोजी राज्यातील 48 संघातील 288 खेळाडुंचे रजिष्ट्रेशनची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर व्यवस्थापकांचे सभेचे आयोजन करण्यात येवुन सदर सभेमध्ये लॉटस टाकुन स्पर्धाच्या फेऱ्या निश्चित करण्यात येतील व दि. 25 रोजी सकाळी आठ वाजेपासुन सामन्यांना प्रारंभ होईल. दि.26 पर्यंत स्पर्धा असुन त्याच दिवशी दुपारनंतर 146 निवड चाचणी खेळाडुंचे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पार पडेल. निवड समिती सदस्यांचे नियंत्रणाखाली राज्यस्पर्धेमधुन निवड चाचणी करीता निवड करण्यात आलेल्या खेळाडुंच्या निवड चाचणीस प्रारंभ होईल. निवड चाचणीमधुन शुक्रवार दि.२७ रोजी राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात येईल. राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन 14 वर्षाआतील मुले/मुली स्पर्धा नोएडा (उत्तर प्रदेश) आक्टोंबर,2019 तिसरा आठवडा, 17 वर्षाआतील मुले/मुली स्पर्धा छिंदवाडा (मध्य प्रदेश) आक्टोंबर,2019 दुसरा आठवडा, 19 वर्षाआतील मुले/मुली स्पर्धा पुणे (महाराष्ट्र) डिसेंबर,2019 दुसरा आठवडा असा राष्ट्रीय स्पर्धेचा अंदाजित कार्यक्रम एसजीफआय मार्फत घोषीत करण्यात आला आहे.
खेळाडू व पंच अधिकारी यांची निवास व भोजन व इतर व्यवस्था
राज्यस्तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे मुलांचे व मुलींचे वसतीगृहातील खोल्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. तसेच पंच निवड समिती सदस्य यांचे निवास व्यवस्थेसाठी शासकीय विभागाचे विश्रामगृहाचे आरक्षण करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडुंची भोजनाची व्यवस्था आयोजन समितीमार्फत करण्यात आली आहे.
राज्यस्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडुंना प्रमाणपत्र व प्राविण्य प्राप्त खेळाडुंना स्मृतीचिन्ह व प्राविण्य प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धा कालावधीत खेळाडुंच्या निवासस्थाना पासुन ते स्पर्धास्थळी व स्पर्धास्थळापासून ते निवासापर्यंत खेळाडुंना ने आण करण्यासाठी प्रभात चॅरीटेबल ट्रस्ट, अकोला यांचे मार्फत वाहनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अधिक्षीका, जिल्हा स्त्री रुग्णालय, यांचे मार्फत वैद्यकीय मदत व प्रथमोपचार सुविधेसाठी वैद्यकीय पथक व आवश्यक गरजेच्या औषधीसह रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडुन स्पर्धास्थळी खेळाडुंची निवास व्यवस्था शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील वसतिगृह येथे पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यात आला आहे.
स्पर्धेचा उद्घाटन व समारोप समारंभ
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता स्व वसंत देसाई स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल, अकोला येथे होईल व समारोप- बक्षिस वितरण समारंभ गुरुवार दि.२६ रोजी सायंकाळी पाच वाजता बॅडमिंटन हॉलमध्ये मान्यवर अतिथी व उच्च पदस्थ अधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.