बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार)- अकोट मतदारसंघात आज सर्व राजकीय पक्ष व संघटना यांनी आज बंद मध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला बेलखेड मध्ये सुद्धा शेतकरी बांधव व नागरिक यांनी सुध्दा बंद मध्ये आवर्जुन सहभाग नोंदविला. यामध्ये जय जवान जय किसान चे नारे सुद्धा देण्यात आले. निसर्गाच्या कुशीत सातपुड्याच्या पायथ्याशी वारी भैरावगड हे मनोहारी पर्यटन स्थळ असून अकोला जिल्ह्यातील प्रसिध्द असे रम्य ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे.
निसर्ग हा प्रत्येकाला आपल्या मोहात पाडतो आणि त्यां सोबतच जर त्यां परिसराला आध्यात्मिक वारसा जर असेल तर त्यां ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त होते. समर्थ रामदासांनी हाच विचार करत तरुण पिढी मधे बलोपासना वाढीस लागावी या साठी श्री. हनुमाण जीची अनेक मंदिरे उभारली त्यातीलच एक वारी भैरवगड येथे आहे. शेकडो वर्षा पासून आध्यात्मिक ऊर्जेचा केंद्र बिंदू ठरत आहे. जवळच असणाऱ्या पर्वत रंगा मधील आदीवाशी, वनवासी जमातींना धर्माशी एकसंध ठेवण्याचे कार्य याच आध्यात्मिक केंद्राने केले आहेत आणि अव्याहत पणे करीत आहे. बाजूने वाहणाऱ्या वाणनदी ने परिसरातील हजारोच्या उपजीविकेच्या आधार दिला आणि येथील पाण्याची समस्या दुर केली. येथील शेतकरी कष्टकरी समाज अधिक समृध्द व्हावा या साठी तत्कालीन आमदार गणगणे साहेबांनी या वाण नदीवर धारण बांधण्याची योजना आखली आणि ती पूर्णत्वाला सुध्दा गेली. परिसरातील शेतकऱ्यांना सिंचना चा मोठे प्रश्न उभा असताना तो कायम दुर करण्या साठी हे मोठे आणि दूरगामी प्रभावशाली पाऊल होते कारण या सिंचन हा एकमेव उद्देश डोळ्या समोर ठेवून या हनुमान संग्रह प्रकल्पाला मान्यता आली.
तालुक्यात पाणी पोहचवीण्या साठी लाहन मोठ्या पाटा चे लघु वितरकान्चे जाळे शेतकऱ्यांना अगदी तुटपुंज्या मोबदला देवून त्याच्या सुपीक जमिनी हून विनन्यात आले. सुपीक जमिनीचे अगदी तुटपुंज्या मोबदल्यात सुध्दा आमचा दिलदार शेतकरी खूष होता कारण त्याला सुपीक्तेचे, सुजलाम सुफलाम वसुंधराई डोळ्या समोर उभी दिसत होती. जमिनी खराब झाल्या चे दुख न मानता शेतकरी भविष्याचि स्वप्न पाहत असताना काही लोकांची वक्रद्रुष्टी या हनुमान सागर प्रकल्पावर पाडली उठ सुठ जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातील प्रत्तेक आपला मालकी अधिकार या धरणावर सांगू लागाला पाहाता पाहता टक्का टक्का वाढवत आज या धरणाला 100%आरक्षित असे लेबल लागले. सिंचनासाठी बांधलेल्या या धरणाला आरक्षित करुन येथील भूमिपुत्र शेतकरी कष्टकरी समाजाला देशोधडीला लावण्याचे कारस्थान ए सी बसणाऱ्या लोकांनी राबविले आहे. 2017 साली या विषयी आंदोलन झाले दोन पाण्यात पीक घेण्याचा नवा फर्मूला काही बुध्धीजीवी अधिकारी लोकांनी शेतकऱ्यांना दिला आणि दोनच पाणी धरणातून सोडून शेतकऱ्यांची थट्टा केली. आम्हाला पिण्यास पाणी हवय करिता आम्ही या धरणाचे पाणी आरक्षित करतो आहोत, अस म्हणायला लाज वाटायला हवी तुमची स्वतंत्र व्यवस्था करा कुणी अडवलय तुम्हाला? आमच्या शेतकऱ्यांचे जिव घेवून तुमची तहान कशी भागवता?
या निर्णायाचा निषेध !
शेती ला पाणी मिळालेच पाहिजे ! हा आमचा अधिकार आहे ! या साठी काही शेतकरी बांधवांनी आपल्या माती साठी लढा उभारला आहे या लढ्याला अधिक तीव्र करू या आणि आपल्या शेतकरी बांधवांचे हात बळकट करूया !
या लढ्यात आपल्या सोबत सहभागी आहे
गावातील सदन शेतकरी व व्यवसाईक असलेले अतुल निमकर्डे, दादाभाऊ टोहरे, भीमाभाऊ माळोकार, गणेशभाऊ सोनटक्के, विक्की खुमकर, निलेश आढाउ, संजुभाऊ भोपळे, कैलास कुयटे, सुनील सुशिर व इतर शेतकरी बांधवांनी व गावकऱ्यांनी बंदला सहभाग नोंदविला.